Lokmat Agro >शेतशिवार > Soyabean Cotton Crop: यंदा खरिपात कपाशीची क्षेत्रवाढ, सोयाबीन माघार घेईल का? वाचा सविस्तर

Soyabean Cotton Crop: यंदा खरिपात कपाशीची क्षेत्रवाढ, सोयाबीन माघार घेईल का? वाचा सविस्तर

Soyabean Cotton Crop: latest news Cotton area increased in Kharif this year, will soybean retreat? Read in detail | Soyabean Cotton Crop: यंदा खरिपात कपाशीची क्षेत्रवाढ, सोयाबीन माघार घेईल का? वाचा सविस्तर

Soyabean Cotton Crop: यंदा खरिपात कपाशीची क्षेत्रवाढ, सोयाबीन माघार घेईल का? वाचा सविस्तर

Soyabean Cotton Crop: मागील दोन ते तीन वर्षापासून सलग नापिकी होत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. त्यात सरासरी उत्पन्न कमी आल्याने मोठा फटका बसतो आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात कपाशीच्या (Cotton) क्षेत्रात वाढ होईल परंतु, सोयाबीन (Soybean) माघार घेईल का? वाचा सविस्तर (Kharif)

Soyabean Cotton Crop: मागील दोन ते तीन वर्षापासून सलग नापिकी होत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. त्यात सरासरी उत्पन्न कमी आल्याने मोठा फटका बसतो आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात कपाशीच्या (Cotton) क्षेत्रात वाढ होईल परंतु, सोयाबीन (Soybean) माघार घेईल का? वाचा सविस्तर (Kharif)

शेअर :

Join us
Join usNext

Soyabean Cotton Crop: मागील दोन ते तीन वर्षापासून सलग नापिकी होत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. त्यात सरासरी उत्पन्न कमी आल्याने मोठा फटका बसतो आहे. (Kharif)

यंदाच्या खरीप हंगामात कपाशीच्या (Cotton) क्षेत्रात वाढ होईल परंतु, सोयाबीन (Soybean) माघार घेईल का?(Kharif) मागील तीन वर्षाच्या पीक पेरणी क्षेत्राच्या सरासरीनुसार यंदाच्या संभाव्य पेरणी क्षेत्राचा अंदाज लावला जातो. त्यादृष्टीने नियोजन होत असल्याची माहिती आहे. (Kharif)

प्रत्यक्षात मृग महिन्यात म्हणजेच जून महिन्यात होणाऱ्या पावसावर पेरणीचे क्षेत्र निर्भर असते. वेळेवर पाऊस आल्यास सोयाबीन, कपाशी व तुरीच्या क्षेत्रात वाढ होते.  (Kharif)

मात्र, पावसाने खंड दिल्यास किंवा पाऊस विलंबाने आल्यास व जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरण्या झाल्यास सोयाबीनचे गणित बिघडते व क्षेत्र कमी होऊन कपाशीमध्ये रुपांतरित होते, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. (Kharif)

गेल्यावर्षी सोयाबीनला दर मिळालेला नाही, शिवाय पावसाळ्यात पिकाचे मोठे झाले नुकसान होते. दोन वर्षे पाऊस चांगला राहिल्याने सोयाबीनचे क्षेत्र अडीच लाख हेक्टर पार झाले. 

मात्र, नंतर पावसामुळे व काढणीच्या काळातही पाऊस झाल्याने सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे. त्यामुळे मागणी वाढून सोयाबीनची दरवाढ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात वर्षभरात सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा एक हजाराने कमी राहिले आहेत. त्याचा फटका यंदाच्या पेरणी क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. (Kharif)

यंदा २.६८ लाख हेक्टर प्रस्तावित

* यंदा सोयाबीनचे २,६८,८०० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. प्रत्यक्षात १५ ते २० हजार हेक्टर पेरणी क्षेत्र यामध्ये कमी होण्याची शक्यता आहे.

* हे क्षेत्र कपाशीमध्ये रुपांतरित होण्याची शक्यता असल्याने यंदा सोयाबीनपेक्षा कपाशीचे क्षेत्र किमान १५ ते २० हजार हेक्टरने जास्त राहण्याची शक्यता आहे.

खरिपात सोयाबीनचे नियोजन

आवश्यक बियाणे मागणी७०,२९७ क्विंटल
शेतकऱ्यांकडील बियाणे२,५२,४६३ क्विंटल
सोयाबीनचे यंदा सरासरी क्षेत्र२,६३,८०० हेक्टर

खरिपामध्ये शेतकऱ्यांचा कल पारंपरिक पिकांकडे राहिला आहे. त्यामुळे सोयाबीन व कपाशीचे क्षेत्र जास्त राहील. सोयाबीनला वर्षभर दर न मिळाल्याने मागील वर्षीपेक्षा कपाशी व तुरीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. - अनिल ठाकरे, कृषी अभ्यासक

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: बापरे! चंद्रपूर जगात सर्वांत उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश

Web Title: Soyabean Cotton Crop: latest news Cotton area increased in Kharif this year, will soybean retreat? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.