Lokmat Agro >शेतशिवार > Sonkhat : कचरा डेपोतील खत ठरतेय फलदायी; कसे केले जाते सोनखत?

Sonkhat : कचरा डेपोतील खत ठरतेय फलदायी; कसे केले जाते सोनखत?

Sonkhat : Fertilizer from garbage depot is proving fruitful; How is Sonkhat made? | Sonkhat : कचरा डेपोतील खत ठरतेय फलदायी; कसे केले जाते सोनखत?

Sonkhat : कचरा डेपोतील खत ठरतेय फलदायी; कसे केले जाते सोनखत?

सातारा पालिकेच्या सोनगाव डेपोत कचऱ्यापासून दररोज ४० टन खत तयार केले जाते. या खतावरच शहरातील बागा बहरू लागल्या असून, शेतकऱ्यांनाही मागणीप्रमाणे खताचा पुरवठा केला जात आहे.

सातारा पालिकेच्या सोनगाव डेपोत कचऱ्यापासून दररोज ४० टन खत तयार केले जाते. या खतावरच शहरातील बागा बहरू लागल्या असून, शेतकऱ्यांनाही मागणीप्रमाणे खताचा पुरवठा केला जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सचिन काकडे
सातारा : सातारा पालिकेच्या सोनगाव डेपोत कचऱ्यापासून दररोज ४० टन खत तयार केले जाते. या खतावरच शहरातील बागा बहरू लागल्या असून, शेतकऱ्यांनाही मागणीप्रमाणे खताचा पुरवठा केला जात आहे.

तब्बल १७.५ एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या पालिकेच्या कचरा डेपोत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकारला आहे. कचरा संकलन, वर्गीकरण, खतनिर्मिती या कामाची जबाबदारी पालिकेने खासगी संस्थेवर सोपवली आहे.

या संस्थेकडून कचरा गाडी डेपोत आल्यानंतर तिचे ४० टन क्षमता असलेल्या वजन काट्यावर वजन केले जाते. यानंतर तो कचरा डेपोत टाकला जातो.

वर्गीकरण केल्यानंतर बायोक्चरल टाकून कुजवलेल्या कचऱ्याचे ३५ दिवसांनंतर खत तयार केले जाते. प्रकल्पातील अत्याधुनिक मशिनरीद्वारे कचऱ्यापासून दररोज ४० तर महिन्याला सुमारे १ हजार २०० टन खत तयार केले जाते.

येथे तयार होणाऱ्या सर्वाधिक खताचा वापर शहरातील उद्यानांमध्ये असलेल्या फुलझाडांसाठी केला जात आहे.

विशेष म्हणजे डेपोत उभारण्यात आलेले मियावाकी उद्यानही या खतावर हिरवेगार झाले आहे. याशिवाय सातारा तालुक्यातील शेतकरीही डेपोत येऊन खत नाममात्र दरात विकत घेतात.

असे केले जाते मैल्यापासून सोनखत
१) सातारा शहरातून संकलित होणारा मैला हा मैला व्यवस्थापन प्रकल्पात आणला जातो.
२) येथे असलेल्या १५ केएलडी क्षमतेच्या डी वॉटरिंग युनिटमध्ये तो रिकामा केला जातो.
३) मशीनमध्ये पॉलिमर टाकले जाते. त्यामुळे मैला व त्यातील पाणी वेगवेगळे होते.
४) वेगळा केलेला मैला सुकवण्यासाठी उन्हात ठेवला जातो.
५) डी वॉटरिंग युनिटमधून बाहेर पडणाऱ्या मैल्यापासून ४ दिवसात सोनखत तयार होते.
६) नैसर्गिक पद्धतीने खत तयार करण्यासाठी सुमारे २५ दिवसांचा कालावधी लागतो.

शेती पिकतेय सोन्यावानी
सातारा पालिकेच्या डेपोत कचरा व मैल्यापासून तयार होणाऱ्या खताला तालुक्यातील शेतकऱ्यांकडूनही मोठी मागणी आहे. केवळ ३ रुपये किलो दराने खत मिळत असल्याने शेतकरी रासायनिक औषधांऐवजी पिकांना सेंद्रिय खत घालून भरघोस उत्पन्न घेत आहेत.

दररोज तयार होणारे खत!
-
कचऱ्यापासून : ४० टन
- मैल्यापासून : १० हजार किलो
- सौरऊर्जा प्रकल्प : ३० किलोवॅट क्षमता
- खत सुकवण्यासाठी : ३ सोलर बेड
- खताचा दर : ३ रुपये किलो

अधिक वाचा: Suru Us Jati : सुरु ऊस लागवडीसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या टॉप जाती कोणत्या; वाचा सविस्तर

Web Title: Sonkhat : Fertilizer from garbage depot is proving fruitful; How is Sonkhat made?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.