Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Solar Pump : अर्धवट साहित्यामुळे बीड जिल्ह्यातील सोलार पंपचे काम रखडले

Solar Pump : अर्धवट साहित्यामुळे बीड जिल्ह्यातील सोलार पंपचे काम रखडले

Solar Pump: Work on solar pump in Beed district stalled due to incomplete materials | Solar Pump : अर्धवट साहित्यामुळे बीड जिल्ह्यातील सोलार पंपचे काम रखडले

Solar Pump : अर्धवट साहित्यामुळे बीड जिल्ह्यातील सोलार पंपचे काम रखडले

शासनाच्या सोलार योजनेचा लाभ घेण्यासाठी सावळेश्वर (पैठण) येथील शेतकरी उत्रेश्वर गोरडे, जयश्री जगदाळे, पांडुरंग मस्के, रेखा दिलीप गायकवाड, यांसह इतर शेतकऱ्यांना चार महिन्यांपूर्वी रोटासोल कंपनीचा सोलार पंप उभारण्यासाठीची मंजुरी मिळाली होती.

Beed : तालुक्यातील सावळेश्वर (पैठण) शिवारातील शेतकऱ्यांना रोटासोल कंपनीकडून सोलार मंजूर झाल्यानंतर शेतात सोलार स्ट्रॅक्चर उभारण्यात आले, त्यावर सोलार प्लेट, पाइप व सोलार पॅनल बसविण्यात आले असले तरी ते कार्यान्वित करण्यासाठी लागणारे इतर साहित्य अद्याप जोडलेले नाहीत. त्यामुळे सावळेश्वर येथील शेतकऱ्यांची ससेहोलपट होत असून, उर्वरित साहित्य तत्काळ बसवून सोलार
चालू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

शासनाच्या सोलार योजनेचा लाभ घेण्यासाठी सावळेश्वर (पैठण) येथील शेतकरी उत्रेश्वर गोरडे, जयश्री जगदाळे, पांडुरंग मस्के, रेखा दिलीप गायकवाड, यांसह इतर शेतकऱ्यांना चार महिन्यांपूर्वी रोटासोल कंपनीचा सोलार पंप उभारण्यासाठीची मंजुरी मिळाली होती.

या शेतकऱ्यांच्या शेतात सोलार स्ट्रॅक्चर उभारण्यात आले, त्यावर सोलार प्लेट, पाइप व सोलार पॅनल बसविण्यात आले आहेत. परंतु, ते कार्यान्वित करण्यासाठी लागणारे इतर साहित्य त्याला अद्याप जोडलेले नसले तरीही या   शेतकऱ्यांच्या शेतात उभारलेल्या सोलार स्ट्रक्चरचे फोटो काढून परत दोन दिवसांत येतो, असे सांगून कंपनीचे संबंधित लोक पसार झाले आहेत. पाच दिवसात सोलार कार्यान्वित न केल्यास गुत्तेदाराविरुद्ध कायदेविषयक जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाई करणार असल्याची माहिती सावळेश्वर येथील शेतकऱ्यांनी दिली आहे.

गुजरातच्या आनंदनगर येथून साहित्य येणार !

  • याप्रकरणी गुत्तेदार अमोल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता शेतकऱ्यांची पीएमसी पेंडिंग आहे.
  • आनंदनगर, गुजरात येथून साहित्य येणार असल्यामुळे उशीर झाला असून, या साहित्याची बिल्टी पडली आहे.
  • दोन दिवसांत साहित्य उपलब्ध होणार आहे, ते मिळताच सोलारचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

Web Title: Solar Pump: Work on solar pump in Beed district stalled due to incomplete materials