Join us

Shettale Yojana : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्यांसाठी मोठा निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 09:48 IST

mukhyamantri shashwat sinchan yojana मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच, वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरित गृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकांकरिता अनुदान वितरीत करण्यात येते.

राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने सुरवातीला ही योजना राज्यात ठराविक भागासाठी होती आता टी संपूर्ण राज्यभर सुरु करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच, वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरित गृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकांकरिता अनुदान वितरीत करण्यात येते.

सन २०२४-२५ मधील वित्त विभागामार्फत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेच्या ₹४०० कोटीच्या (सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी ₹३०० कोटी + वैयक्तिक शेततळे घटकासाठी ₹१०० कोटी) कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

कृषि आयुक्तालयाकडून प्राप्त मागणी व सद्यःस्थितीत असलेल्या प्रलंबित दायित्वाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरीता ₹५२९.५० लक्ष निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सन २०२४-२५ या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरीता ₹५२९.५० लक्ष (रुपये पाच कोटी एकोणतीस लाख पन्नास हजार मात्र) निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात येत आहेत.या योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदान अदागयीची कार्यवाही महा-डीबीटी प्रणालीद्वारे करावी आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी.

कोणत्या जिल्ह्यात किती शेततळे आणि किती निधी मिळणार पाहण्यासाठी https://shorturl.at/evAsi या लिंकवर क्लिक करा व पान क्रमांक ५ आणि ६ पहा.

टॅग्स :शेतीशेतकरीपीकसरकारराज्य सरकारसरकारी योजनापाणीमुख्यमंत्री