Lokmat Agro >शेतशिवार > बचत गटांना आता हक्काची बाजारपेठ; राज्यात १० जिल्ह्यांमध्ये 'उमेद मॉल' उभारण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

बचत गटांना आता हक्काची बाजारपेठ; राज्यात १० जिल्ह्यांमध्ये 'उमेद मॉल' उभारण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

Self-help groups now have a proper market; Cabinet approves setting up 'Umed Mall' in 10 districts of the state | बचत गटांना आता हक्काची बाजारपेठ; राज्यात १० जिल्ह्यांमध्ये 'उमेद मॉल' उभारण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

बचत गटांना आता हक्काची बाजारपेठ; राज्यात १० जिल्ह्यांमध्ये 'उमेद मॉल' उभारण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

Umed Mall ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाचे ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ काम करते.

Umed Mall ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाचे ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ काम करते.

शेअर :

Join us
Join usNext

ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाचे ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ काम करते.

या अभियाना अंतर्गत राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. योजनेसाठी एकूण २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील महिलांतील उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी सुरू झालेल्या स्वयं सहाय्यता समूहांच्या (SHG) विविध उत्पादनांना स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठ मिळावी या उद्देशाने हे केंद्र उभारले जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यांमध्ये हे मॉल कार्यान्वित करण्यात येणार असून, नंतर टप्प्याटप्प्याने ही योजना इतर जिल्ह्यात विस्तारली जाणार आहे.

प्रत्येक उमेद मॉलसाठी कमाल २० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, हे मॉल जिल्हा परिषदेच्या जमिनीवर उभारण्यात येतील.

मॉलमध्ये प्रत्येक गटाला चक्राकार पद्धतीने गाळे उपलब्ध करून दिले जातील. महिलांना संवाद आणि प्रशिक्षणासाठी स्वतंत्र हॉलची सुविधा देखील असेल.

उमेद मॉलसाठी जिल्हा परिषदांकडून प्रस्ताव मागवले जातील. ज्या जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलसाठी जमीन उपलब्ध असेल आणि ती मध्यवर्ती ठिकाणी असेल, त्या जिल्ह्यांची निवड केली जाईल.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत निविदा प्रक्रिया, आराखडे तयार करणे, कामाची अंमलबजावणी केली जाईल. उमेद मॉलची देखभाल व दुरुस्ती जिल्हा परिषदेमार्फत केली जाणार आहे.

अधिक वाचा: त्वचा विकार कमी करणाऱ्या 'ह्या' रानभाजीची कशी बनवाल भाजी? वाचा सविस्तर

Web Title: Self-help groups now have a proper market; Cabinet approves setting up 'Umed Mall' in 10 districts of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.