Seed Production : महाराष्ट्र बीज महामंडळाच्या (महाबीज) बीज (Mahabeej) उत्पादनासाठी बुलढाणा जिल्हा राज्यातील एक प्रमुख केंद्र ठरला आहे. जिल्ह्यातील तब्बल ८१९ गावांतील सुमारे ६ हजार शेतकरी महाबीजसाठी (Mahabeej) दर्जेदार बियाण्यांचे उत्पादन (Seed Production ) करतात.
राज्यातील बीज उत्पादनात बुलढाणा जिल्ह्याचा वाटा सर्वाधिक आहे. येथे होणारे बियाणे उत्पादन सोयाबीन, हरभरा, ज्वारी, कापूस व मका यासारख्या पिकांवर आधारित आहे.(Mahabeej)
जिल्ह्याचे हवामान, जमीन व शेतकऱ्यांचा अनुभव यामुळे बुलढाणा जिल्हा बीज उत्पादनासाठी(Seed Production ) अत्यंत अनुकूल ठरतो.
महाबीजमार्फत(Mahabeej) शेतकऱ्यांचे उत्पादन बाजारभावापेक्षा २५ ते ३५ टक्के जास्त दराने खरेदी केले जाते, तसेच शासनाकडून अनुदानदेखील दिले जाते. परिणामी, जिल्ह्यातील शेतकरी दर्जेदार बियाण्याच्या उत्पादनात(Seed Production ) मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात महाबीजचे(Mahabeej) एकूण बीजोत्पादन २७,८९५ एकर क्षेत्रात, ६,१५६ बीजोत्पादक शेतकऱ्यांमार्फत व ८१९ गावांमध्ये राबवले जाते. प्रमाणित व पायाभूत दर्जाचे बियाणे प्रामुख्याने बुलढाणा, चिखली व देऊळगाव राजा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित केले जाते.
तालुकानिहाय बीजोत्पादन क्षेत्र (एकरमध्ये)
बुलढाणा | १९७८ |
चिखली | २५१७ |
मेहकर, लोणार | २०८१ |
दे. राजा, सिं. राजा | ५३७ |
खामगाव, शेगाव | ४७७ |
संग्रामपूर, ज. जामोद | २०९ |
मलकापूर, मोताळा | ४२६ |
नांदुरा | १८४ |
राज्याच्या तुलनेत २५ टक्के उत्पादन
महाबीजच्या एकूण उत्पादनापैकी २५ टक्के बियाण्याचे उत्पादन केवळ बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात घेतले जाते. बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या बियाण्याला बाजारभावाच्या तुलनेत २५ ते ३५ टक्के अधिक दर, तसेच शासनाकडून अनुदान मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला मोठी चालना मिळत आहे.
सोयाबीनला मिळाला ५ हजार ९२० रुपये दर!
महाबीजसाठी बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाणित बियाणे सन २०२३-२४ मध्ये ५ हजार ९२० रुपये प्रति क्विंटलने खरेदी करण्यात आले. शेतकऱ्यांना शासनाकडून अनुज्ञेय अनुदानदेखील मिळाले आहे. दुसरीकडे, खुल्या बाजारात सोयाबीनला ४ हजार रुपयांचाही दर मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी 'महाबीज'च्या बीजोत्पादन कार्यक्रमाकडे वळत आहेत, हे स्पष्ट होते. नविन वाणांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रयोगाची संधीही मिळत असल्याचे चित्र आहे.
१.५६ लाख क्विंटल कच्चे बियाणे उपलब्ध
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये जिल्ह्यात १ लाख ५६ हजार क्विंटल कच्चे बियाणे उपलब्ध झाले आहे. हे बियाणे महाबीजच्या खामगाव, मलकापूर आणि चिखली येथील प्रक्रिया केंद्रांमध्ये प्रक्रियेनंतर प्रमाणित व पायाभूत दर्जाचे करण्यात येईल. त्यानंतर खरीप व रब्बी २०२५-२६ हंगामासाठी जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाईल.
बुलढाणा जिल्ह्यात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात महाबीजचे एकूण बीजोत्पादन क्षेत्र २७,८९५ एकर आहे. यामध्ये ६,१५६ बीजोत्पादक शेतकऱ्यांमार्फत ८१९ गावांमध्ये कार्यक्रम राबवण्यात येतो. २०२४-२५ मध्ये जिल्ह्यात १.५६ लाख क्विंटल कच्चे बियाणे उपलब्ध झाले आहे. यंदाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बीजोत्पादन कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा. - अशोक ठाकरे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, बुलढाणा
हे ही वाचा सविस्तर : BT Cotton Seed: बीटी बियाण्यांच्या दरवाढीने यंदा ५.५५ कोटींचा फटका; प्रतिपाकीट इतक्या रुपयांनी वाढ वाचा सविस्तर