Lokmat Agro >शेतशिवार > Satbara Apak Shera : सातबाऱ्यावरील अपाक शेरा आता लगेच हटवणार; सुरु झाली 'ही' मोहीम

Satbara Apak Shera : सातबाऱ्यावरील अपाक शेरा आता लगेच हटवणार; सुरु झाली 'ही' मोहीम

Satbara Apak Shera : The Apak Shera on Satbara will be removed immediately; 'This' campaign has started | Satbara Apak Shera : सातबाऱ्यावरील अपाक शेरा आता लगेच हटवणार; सुरु झाली 'ही' मोहीम

Satbara Apak Shera : सातबाऱ्यावरील अपाक शेरा आता लगेच हटवणार; सुरु झाली 'ही' मोहीम

Satbara Apak Shera महसूल विभागाच्या जिवंत ७/१२ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात जमिनीवरील अनावश्यक पालनकर्त्यांची नावे वगळून ७/१२ उतारे अद्ययावत करण्याची गतिमान मोहीम हाती घेतली आहे.

Satbara Apak Shera महसूल विभागाच्या जिवंत ७/१२ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात जमिनीवरील अनावश्यक पालनकर्त्यांची नावे वगळून ७/१२ उतारे अद्ययावत करण्याची गतिमान मोहीम हाती घेतली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जमिनीवरील हक्कांची पारदर्शकता ही शेतकऱ्यांच्या भवितव्याची हमी आहे. १८ वर्षे वय पूर्ण असलेल्या व्यक्तीचा अपाक (अज्ञान पालक कर्ता) शेरा ठेवू नये असे महसूल कर्मचाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

महसूल विभागाच्या जिवंत ७/१२ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात जमिनीवरील अनावश्यक पालनकर्त्यांची नावे वगळून ७/१२ उतारे अद्ययावत करण्याची गतिमान मोहीम हाती घेतली आहे.

खातेदाराच्या वयाचा पुरावा तपासून ई-हक्कप्रणालीतून अपाक शेरा कमी केला जाणार आहे. जन्म-मृत्यू रजिस्टरच्या नोंदींवर आधारित तपासणी करून अद्ययावत प्रक्रिया पूर्ण होईल. शेतकऱ्यांनी वयाचा पुरावा तहसील कार्यालयात सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

अ.पा.क.शेरा म्हणजे काय?
एखाद्या जमीनीवर नावे असलेल्या व्यक्तींपैकी कोणी व्यक्ती कायद्याने अज्ञान (१८ वर्षांपेक्षा लहान) असेल तर तिच्या सोबत अज्ञान पालक कर्ता म्हणून सज्ञान व्यक्तीचे नाव ७/१२ उताऱ्यावर लावण्यात येते. अज्ञान व्यक्तीचे वय १८ पूर्ण झाल्यानंतर अज्ञान पालक कर्ता व्यक्तिचे नाव ७/१२ वरुन कमी करण्यात येते. याला अ.पा.क. शेरा कमी करणे असे म्हणतात.

अ.पा.क.शेरा कमी करणे नोंद करण्याकरीता आवश्यक माहिती
१) ज्या जमिनीवर नाव लावायचे ते स्थान (जिल्हा, तालुका, गाव, गट नंबर/मृत व्यक्तीचे नाव)
२) संपूर्ण नाव
३) मोबाईल नंबर
४) ई-मेल (असल्यास)
५) अज्ञान खातेदाराची जन्मतारीख

खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक
१) खातेदाराचे वयाचा पुरावा  जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला
२) ओळखपत्र.

संपर्क
शेतकऱ्यांच्या हक्कांमध्ये पारदर्शकता ही आमची प्राथमिकता आहे. वेळेत अपाक शेरा हटवणे हेच वाद टाळण्याचे प्रमुख पाऊल आहे. १८ वर्षे पूर्ण असलेल्या व ७/१२ वर अपाक शेरा असलेल्या व्यक्तींनी वयाचा पुरावा घेऊन तलाठ्यांशी संपर्क साधावा व अपाक शेरा हटवून नोंद लावावी.

अधिक वाचा: E Pik Pahani : ई-पीक पाहणी करताना किती अंतरावरून घ्यावा लागणार पिकांचा फोटो?

Web Title: Satbara Apak Shera : The Apak Shera on Satbara will be removed immediately; 'This' campaign has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.