Join us
Daily Top 2Weekly Top 5

सरसेनापती कारखान्याचे १५ डिसेंबरपर्यंतचे ऊस बिल जमा; प्रतिटन किती रुपयाने केले पेमेंट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:31 IST

बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगामातील १ ते १५ डिसेंबर या कालावधीतील ऊस बिले जमा केली आहेत.

सेनापती कापशी : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगामातील १ ते १५ डिसेंबर या कालावधीतील प्रतिटनाला रु. ३४०० प्रमाणे ऊस बिले जमा केली आहेत.

तोडग्यानुसार १०० रुपये गळीत हंगाम समाप्तीनंतर दिले जाणार आहे. दरम्यान, १६ ते ३० नोव्हेंबर या पंधरवड्यातील तोडणी वाहतूक बिलेही अदा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

घोरपडे साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात आज अखेर ३,८१, ७७५ मेट्रिक टन इतके गाळप केले आहे. कारखान्याचा आजचा साखर उतारा १३.४० टक्के आहे व सरासरी ११.८९ टक्के आहे.

३० नोव्हेंबरअखेर एकूण २,०४,८१० मेट्रिक टनांची ऊस बिले यापूर्वीच अदा झालेली आहेत. अशाप्रकारे आजअखेर ३,०१,३०५ मेट्रिक टनांची ऊस बिले अदा झालेली आहेत.

अधिक वाचा: देशपातळीवर सर्वोत्कृष्ट ठरलेला 'हा' साखर कारखाना राज्यातही ठरला सर्वोत्तम

English
हिंदी सारांश
Web Title : Sarsenapati Sugar Factory Pays ₹3400/Ton Sugarcane Bills Until December 15

Web Summary : Sarsenapati Santaji Ghorpade Sugar Factory cleared sugarcane bills at ₹3400 per ton for December 1-15. An additional ₹100 will be paid after season end. The factory has crushed 3,81,775 metric tons with a 13.40% sugar recovery rate. ₹3,01,305 metric tons of sugarcane bills have been paid to date.
टॅग्स :साखर कारखानेऊसकोल्हापूरशेतकरीबँक