Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीएम सन्मान योजनेचे ९१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर १८३७ कोटी रुपये झाले जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 11:18 IST

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ कालावधीतील २२ वा हप्ता शुक्रवारी (दि. १३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आला. ज्यात राज्यातील ९१ लाख १८ हजार ८३१ शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ कालावधीतील २२ वा हप्ता शुक्रवारी (दि. १३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आला. ज्यात राज्यातील ९१ लाख १८ हजार ८३१ शेतकऱ्यांना १ हजार ८३७कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. यापूर्वी राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना २१ हप्त्यांमध्ये ३९ हजार ३०० कोटींचा लाभ थेट खात्यात जमा झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुवाहाटी येथे शेतकऱ्यांना लाभवितरणाचा कार्यक्रम झाला. केंद्र शेतकऱ्यांना फेब्रुवारी २०१९ पासून ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) २ हजार रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात दरवर्षी ६ हजार रुपये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होतात. राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत २१ हप्त्यांमध्ये ३९ हजार ३०० कोटींचा लाभ जमा झाला आहे.

जिल्हानिहाय लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या अशी

जिल्हाशेतकरी संख्याजिल्हाशेतकरी संख्याजिल्हाशेतकरी संख्या
मुंबई उप.-मुंबई शहरपालघर१०१६३५
ठाणे७२३४० रायगड११५२९१ रत्नागिरी१५७१७७ 
सिंधुदुर्ग११९४४६ कोल्हापूर४६४८६९ सांगली३८१४५२ 
सातारा४३८६६८ पुणे४३३७०६ अहिल्यानगर५४५२८० 
जालना२९६३४६ छ. संभाजीनगर३४४०१४ नाशिक४२८६६२ 
सोलापूर४९२४४१ धुळे१५५५९८नंदुरबार१०३३६३ 
जळगाव३९५३६९ बुलढाणा ३४०००१ वर्धा१२९०५७ 
नागपूर१७३५२५ भंडारा२१४२२९ अमरावती २७११९० 
गोंदिया२१७७०० अकोला१८८२४० वाशिम१६६९६७ 
यवतमाळ२९०९२७ चंद्रपूर२४६३०९ परभणी२५०२०२ 
गडचिरोली१४६१४७ लातूर२६९६७७ नांदेड३८४५२७ 
हिंगोली १७५८०७ बीड३७२३८४ धाराशिव२३६२८५ 
एकूण ९११८८३१ ----

सलग्न खात्याचे इ-केवायसी हवे

९१ लाख १८ हजार ८३१ शेतकरी कुटुंबांना १ हजार ८३७ कोटी रुपयांचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक लाभासाठी केंद्राने खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा झाला आहे. योजनेच्या लाभार्थ्याने भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, आधार संलग्न, ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.

हेही वाचा : 'व्हाइट कॉलर' नोकरी सोडून उभे केले दुग्ध व्यवसायाचे साम्राज्य; जाणून घ्या काय आहे विशाल यांची यशकथा

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनामहाराष्ट्रशेतकरीशेती क्षेत्रसरकार