Join us

थकबाकी असतानाही आरआरसी कारवाई रद्द; 'या' कारखान्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 12:36 IST

साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे असताना थकबाकी नसल्याचे दाखवून आरआरसी कारवाई रद्द करण्याचा घाट या कारखान्याकडून घालण्यात आला.

सोलापूर : साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे असताना थकबाकी नसल्याचे दाखवून आरआरसी कारवाई रद्द करण्याचा घाट या कारखान्याकडून घालण्यात आला.

याप्रकरणी साखर सहसंचालक, लेखाधिकारी व भैरवनाथ शुगरच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पत्र ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य सुहास पाटील यांनी सचिवांना दिले आहे.

जिल्हातील भैरवनाथ शुगर आलेगाव व भैरवनाथ शुगर लवंगी या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे वेळेवर न दिल्याने या दोन्ही साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई साखर आयुक्तांनी केली आहे.

आरआरसी कारवाईनंतर या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची काही रक्कम दिली, मात्र रक्कम दिली नसताना दिल्याचे दाखविले.

थकबाकी क्लीअर केल्याचे पत्र साखर कारखाना व्यवस्थापनाने साखर सहसंचालकांना दिले. त्यांनी शेतकऱ्यांची थकबाकी दिल्याची खात्री न करता पुढील प्रक्रिया केली.

ही बाब ऊस नियंत्रण समितीचे सदस्य सुहास पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत सोलापूर साखर सहसंचालक कार्यालयाकडून माहिती घेतली असता थकबाकी नसल्याचे दाखविण्यात आल्याचे लक्षात आले.

पाटील यांनी शेतकऱ्यांसह पुणे साखर आयुक्त कार्यालयाला धडक मारली. तेथेही उडवा उडवी ऐकू आल्याने साखर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मारला.

शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे न देता थकबाकी क्लिअर असल्याचे दाखविण्यात आल्याचे साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांच्या लक्षात आणून दिले. लागलीच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले.

इतर कारखान्यांकडे असू शकते थकबाकी◼️ साखर आयुक्त कार्यालयाकडे भैरवनाथ शुगर आलेगावकडे २.९५ कोटी व लवंगीकडे १.२८ कोटी थकबाकी दिसत होती.◼️ ही बाकी दिल्याचे साखर कारखान्यांनी साखर सहसंचालक कार्यालयाला कळविले.◼️ प्रत्यक्षात लवंगीकडे २.३७ कोटी, तर आलेगावकडे ५.१० कोटी थकबाकी होती.◼️ असाच प्रकार जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांबाबत असू शकतो, असे सांगण्यात आले.

अधिक वाचा: Farmer Success Story : खारे बंधूंची किमया, दीड एकरातून घेतले २० लाखांच्या केळीचे उत्पादन

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतकरीसोलापूरराज्य सरकारसरकारआयुक्त