Join us

River Linking Project : नदीजोड प्रकल्पांना वित्तीय साहाय्य मिळणार वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 09:57 IST

River Linking Project : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (७ फेब्रुवारी) रोजी महाराष्ट्राच्या जलसमृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या विविध प्रकल्पांसाठी (Projects) वित्तीय साहाय्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला तिन्ही वित्तीयसंस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (७ फेब्रुवारी) रोजी महाराष्ट्राच्या जलसमृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या विविध प्रकल्पांसाठी (Projects)  वित्तीय साहाय्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला तिन्ही वित्तीयसंस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

नारपार सिंचन प्रकल्प, मराठवाडा वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्प, दमनगंगा-एकदारे-गोदावरी योजनेला वित्तीयसहाय मिळण्यासाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक, कोरियन एक्झिम बँक व एएफडी यांच्यासमवेत चर्चा केली. या प्रकल्पांच्या वित्तीय साहाय्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला तिन्ही वित्तीयसंस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या बैठकीत नारपार सिंचन प्रकल्प (Irrigation Projects ), मराठवाडा वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्प, दमनगंगा-एकदारे-गोदावरी योजना (River Linking Project ) याबाबत सादरीकरण करण्यात आले. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष हुन किम यांनी या प्रकल्पाबाबत आम्ही सर्वतोपरी साहाय्य करू, असे सांगितले.

या बैठकीस कोरियन एक्झिम बँकेचे वरिष्ठ अधिकारी जंग वॅन रीव्यू, मित्राचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदाल, गोदावरी मराठवाडा विकास पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एस. आर. तिरमनवार, तापी सिंचन विकास मंडळाचे कार्यकारी संचालक जे. डी. बोरकर, कोरियन एक्झिम बँकेचे प्रकल्प विकासतज्ज्ञ रागेश्री बोस उपस्थित होते.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सकारात्मक

तापी रिचार्ज योजनेबाबत मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली असून त्यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शविल्याची माहिती सिंचन विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी दिली. दूरदृश्यप्रणालीद्वारे त्यांनी बैठकीत सहभाग घेतला.

हे ही वाचा सविस्तर : Drought in Marathwada : मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा संपणार; 'या' आहेत उपाययोजना

टॅग्स :शेती क्षेत्रपाणीपाटबंधारे प्रकल्पमराठवाडा वॉटर ग्रीडशेतकरी