अनिल भंडारी
'नाफेड'तर्फे बीड जिल्ह्यात खरेदी करण्यात येणाऱ्या सोयाचीनची हेक्टरी मर्यादा वाढविण्यात आली असून, मुदतवाढ देण्यात आल्याने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे; परंतु आर्द्रतेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
त्यामुळे हेक्टरी मर्यादा वाढवली, नोंदणीला मुदतवाढ दिली; पण आर्द्रतेचे काय? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
बीड जिल्ह्यात १ ऑक्टोबरपासून नाफेडकडून ११ तालुक्यांमध्ये २९ केंद्रांवर सोयाबीनची नोंदणी तसेच खरेदी सुरू करण्यात आली. शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर आतापर्यंत हेक्टरी फक्त साडेनऊ क्विंटल सोयाबीन विक्रीस परवानगी होती. या अटीमुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील सोयाबीन नाईलाजाने खासगी व्यापान्यांना विकावे लागत होते.
दरम्यान, ६ डिसेंबर २०२४ रोजी कृषी विभागाने सुधारित उत्पादकता बीड अन् लातूर जिल्ह्यांसाठी लागू केली, या आदेशानुसार हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदीची हेक्टरी मर्यादा वाढली आहे. हेक्टरी २१५ क्विंटल सोयाबीन शासकीय खरेदी केंद्रावर यापुढे घेतले जाणार आहे.
या निर्णयाआधी सोयाबीन विक्की केलेल्या शेतकऱ्यांनादेखील वाढीव मर्यादया लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पोर्टलवर क्षेत्र नोंदणी केलेली असेल व ती निकषात बसत असेल तरच त्यांना सोयाबीन विक्री करता येणार आहे.
नोंदणी करण्यास १५ दिवसांचा अवधी
हेगाम २०२४-२५ मधील हमीभावाने सोयाबीन, मूग व उडीद खरेदीसाठी शेतकऱ्यांना आता ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. सहकार विभागाच्या अपर सचिव संगीता शेळके यांनी याबाबत आदेश निर्गमित केला आहे. पूर्वी ही मुदत २५ डिसेंबरपर्यंत होती.
हमीभाव केंद्रांवरच विक्री करा
• सोयाबीनच्या आर्द्रतेबाबत निर्णय प्रलंबित असून, यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.• ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ऑनलाइन नोंदणी केलेली नाही त्यांनी आता ३५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करून सोयाबीन, मूग, उडीद वांची हमीभाव खरेदी केंद्रावरच विक्री करावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांनी केले आहे.
आर्द्रतेबाबत स्पष्टता हवी
हमीभाव खरेदी केंद्रांवर सोयाबीन खरेदीसाठी आर्द्रतेचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा कमी असावे, अशी अट होती. या अटीत बसत नसल्याने अनेक शेतकयांनी व्यापाऱ्यांना तसेच अडतीवर माल विकला. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने १५ टक्क्यांपर्यंत आर्द्रतेचा आदेश दिलेला असतानाही अद्याप खरेदी केंद्रांना तसा आदेश मिळालेला नाही.
पोर्टलवरील क्षेत्र नोंदीनुसार शेतमाल विकता येणार
शेतकऱ्यांनी ऑनलाइन पोर्टलवर केलेल्या क्षेत्र नोंदणीनुसार तसेच हेक्टरी मर्यादितुसार शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शेतमाल हमीदराने विकता येईल. नॉटणीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुटत वाढविण्यात आली आहे. शेतकयांनी लाभ घ्यावा. - मनोज वाजपेयी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन, बीड.
जिल्हानिहाय उत्पादकता हेक्टरी (क्विंटलमध्ये)
• ९.५० - प्रथम पूर्व अंदाजानुसार उत्पादकता• २१.५१ - कृषी आयुक्तालय पत्रानुसार सुधारित उत्पादकता