Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षात रेडीरेकनरचा दर वाढण्याची शक्यता; मार्च अखेर किती दिवस सुरु राहणार दस्त नोंदणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:26 IST

dasta nondani आर्थिक वर्ष सन २०२५-२६ संपत आल्याने संपत आल्यामुळे मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

आर्थिक वर्षाची अखेर असल्याने आणि गुढी पाडव्यानंतर नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

हे लक्षात घेऊन मुंबई, उपनगरसह राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

राज्याचे नोंदणी उपमहानिरीक्षक (पुणे) उदयराज चव्हाण यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. सर्व सहजिल्हा निबंधक, मुद्रांक जिल्हाधिकारी यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

स्टॅम्प ड्यूटी आणि रजिस्ट्रेशन फी हे राज्य शासनाच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे. २६ मार्च, २८ मार्च, २९ मार्च आणि ३१ मार्च २०२६ या चार सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवावीत.

तसेच, ज्या कार्यालयांची साप्ताहिक सुटी शनिवार-रविवार वगळता इतर दिवशी असते, त्यांनी त्यांच्या दोन साप्ताहिक सुट्टयांपैकी एक दिवस कामकाजासाठी खुला ठेवावा, असे निर्देश चव्हाण यांनी सर्व सहजिल्हा निबंधकांना दिले आहेत.

२६ मार्चला राम नवमी, ३१ मार्चला महावीर जयंती तर २८-२९ मार्चला शनिवार-रविवारची शासकीय सुटी आहे. म्हणून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने सुटीच्या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

इष्टांकपूर्तीसाठी निर्णय◼️ दस्तनोंदणीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन इष्टांकपूर्ती करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.◼️ याचबरोबर, संबंधित कामकाजाचे नियंत्रण, देखरेख, अभिनिर्णय प्रक्रिया आणि मुद्रांक शुल्काशी संबंधित प्रलंबित बाबी वेळेत पूर्ण करण्यास सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयेही या कालावधीत सुरू ठेवण्यात येणार आहेत.

अधिक वाचा: राज्यात ६० खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यास परवानगी; आता दस्त नोंदणीला किती रुपये?

टॅग्स :महसूल विभागसरकारराज्य सरकारकुलसचिवमहाराष्ट्रमुंबईकोल्हापूरजिल्हाधिकारीसुट्टी