Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Raigad Hapus : रायगड हापूसची चव उशिराने चाखता येणार; जमिनीत ओलावा असल्याने यंदा आंब्याला मोहराची प्रक्रिया उशिराने

Raigad Hapus : रायगड हापूसची चव उशिराने चाखता येणार; जमिनीत ओलावा असल्याने यंदा आंब्याला मोहराची प्रक्रिया उशिराने

Raigad Hapus : Raigad Hapus can be tasted late; Due to the moisture in the soil, this year the process of ripening mangoes is delayed | Raigad Hapus : रायगड हापूसची चव उशिराने चाखता येणार; जमिनीत ओलावा असल्याने यंदा आंब्याला मोहराची प्रक्रिया उशिराने

Raigad Hapus : रायगड हापूसची चव उशिराने चाखता येणार; जमिनीत ओलावा असल्याने यंदा आंब्याला मोहराची प्रक्रिया उशिराने

कोकणच्या (Kokan) हापूसप्रमाणे (Hapus) रायगडचा हापूसही मोठ्या प्रमाणात बाजारात (Market) हंगामात येत असतो. मात्र, यंदा थोडा उशिरा या आंब्याची (Mango) चव चाखता येणार आहे. या वर्षी पाऊस २८ ऑक्टोबरपर्यंत सुरू होता. त्यामुळे जमिनीत ओलावा आहे. त्यामुळे आंब्याच्या झाडाला पालवी मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे.

कोकणच्या (Kokan) हापूसप्रमाणे (Hapus) रायगडचा हापूसही मोठ्या प्रमाणात बाजारात (Market) हंगामात येत असतो. मात्र, यंदा थोडा उशिरा या आंब्याची (Mango) चव चाखता येणार आहे. या वर्षी पाऊस २८ ऑक्टोबरपर्यंत सुरू होता. त्यामुळे जमिनीत ओलावा आहे. त्यामुळे आंब्याच्या झाडाला पालवी मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे.

राजेश भोस्तेकर

अलिबाग : कोकणच्या हापूसप्रमाणे रायगडचा हापूसही मोठ्या प्रमाणात बाजारात हंगामात येत असतो. मात्र, यंदा थोडा उशिरा या आंब्याची चव चाखता येणार आहे. या वर्षी पाऊस २८ ऑक्टोबरपर्यंत सुरू होता. त्यामुळे जमिनीत ओलावा आहे. त्यामुळे आंब्याच्या झाडाला पालवी मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे.

मोहराची प्रक्रिया उशिराने सुरू होऊन आंबा हंगाम लांबणीवर पडणार आहे. जिल्ह्यात एकूण १४ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड करण्यात आली आहे. उत्पादनक्षम क्षेत्र १२ हजार ५०० हेक्टर इतके आहे. गेल्या आठवड्यापर्यंत पडलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा कायम आहे.

दिवाळी संपली, तरी थंडी नाही

ऑक्टोबर महिन्यात उष्म्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होतो. नोव्हेंबरपासून थंडी सुरू झाल्यावर मुळांना ताण बसून मोहराची प्रक्रिया सुरू होते. परंतु, दिवाळी सुरू झाली तरी अद्याप थंडी जाणवू लागलेली नाही.

महिनाभर वाट पाहावी लागणार

• जमिनीतील ओलाव्यामुळे कलमांना पालवी सुरू झाली आहे.

• जुनी पानगळ होऊन नवीन पाने येत आहेत. पालवी जीर्ण होण्यासाठी किमान दीड ते दोन महिने लागतात.

• त्यानंतर मोहर प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. मोहर प्रक्रियेनंतर खऱ्या अर्थाने आंबा हंगामाला सुरुवात होणार आहे.

पहिल्या टप्प्यातील आंबा मार्च ते एप्रिल महिन्यात

नोव्हेंबरमध्ये मोहर आल्यास फेब्रुवारीपर्यंत पहिल्या टप्प्यातील आंबा बाजारात येण्याची शक्यता असते. परंतु, मोहरच उशिरा आल्यास पहिल्या टप्यातील आंबा मार्च ते एप्रिल महिन्यामध्येच येण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षे ऑक्टोबर हीटचे प्रमाण चांगले राहिल्याने नोव्हेंबरमध्ये पहिल्या टप्प्यात मोहर आला होता.

हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत असून, उत्पादन खालावत आहे. या वर्षीही हंगाम लांबण्याची शक्यता आहे. निसर्गातील बदलाची नोंद विमा कंपन्या घेत नसल्यामुळे बागायतदारांचे नुकसान होत आहे. - डॉ. संदेश पाटील, बागायतदार.

हेही वाचा : Farmer Success Story : आधुनिक तंत्रज्ञानाने सिमला मिरचीची लागवड कृष्णारावांना चार महिन्यांत मिळाले ३ लाख रुपयांचे उत्पन्न

Web Title: Raigad Hapus : Raigad Hapus can be tasted late; Due to the moisture in the soil, this year the process of ripening mangoes is delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.