Lokmat Agro >शेतशिवार > कृषी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेचा ३७वा वर्धापनदिन दिमाख्यात साजरा!

कृषी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेचा ३७वा वर्धापनदिन दिमाख्यात साजरा!

pune agriculture college ex student group alumni 37 anniversary programme | कृषी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेचा ३७वा वर्धापनदिन दिमाख्यात साजरा!

कृषी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेचा ३७वा वर्धापनदिन दिमाख्यात साजरा!

या कार्यक्रमात कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे माजी विद्यार्थी मा. तुकाराम चव्हाण (IPS) Rtd., माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक मुंबई यांना संघटने तर्फे “कृषि जीवन गौरव पुरस्कार २०२५” देऊन प्रमुख पाहुणे डॉ. शंकरराव मगर माजी कुलगुरू यांच्या हस्ते गौरविण्यात आले

या कार्यक्रमात कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे माजी विद्यार्थी मा. तुकाराम चव्हाण (IPS) Rtd., माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक मुंबई यांना संघटने तर्फे “कृषि जीवन गौरव पुरस्कार २०२५” देऊन प्रमुख पाहुणे डॉ. शंकरराव मगर माजी कुलगुरू यांच्या हस्ते गौरविण्यात आले

शेअर :

Join us
Join usNext

Pune : माजी विद्यार्थी संघटना कृषि महाविद्यालय पुणे यांचा ३७ वा वर्धापन दिन १ फेब्रुवारी २०२५ रोजी पुणे येथील डॉ. शिरनामे सभागृहात उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माजी व आजी मिळून २५० विद्यार्थी हजर होते. 

यावेळी कोकण कृषी विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर व राहुरी कृषी विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते तर सध्याचे राहुरू कृषी विद्यापिठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. साताप्पा खरबडे व कृषी महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने हे प्रमुख उपस्थित होते. हनुमंतराव मोहिते, उपाध्यक्ष यांनी प्रास्ताविक केले. तर शेखर गायकवाड (IAS) अध्यक्ष यांनी संघटनेची सविस्तर माहिती सांगितली.
 
या कार्यक्रमात कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे माजी विद्यार्थी मा. तुकाराम चव्हाण (IPS) Rtd., माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक मुंबई यांना संघटने तर्फे “कृषि जीवन गौरव पुरस्कार २०२५” देऊन प्रमुख पाहुणे डॉ. शंकरराव मगर माजी कुलगुरू यांच्या हस्ते गौरविण्यात आले तर प्रा. डॉ. जयराम खिलारी, Ph.D. माजी अध्यक्ष द्राक्ष बगायतदार संघ, पुणे यांना “कृषि सन्मान पुरस्कार २०२५” देऊन डॉ. राजाराम देशमुख माजी माजी कुलगुरू  यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

तसेच मा. श्री. प्रभाकर शिंदे अध्यक्ष, पंचगंगा सीड्स – छत्रपती संभाजी नगर यांना “कृषि सन्मान पुरस्कार २०२५” डॉ शंकरराव मगर माजी कुलगुरू यांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच विश्वास घोरपडे, उपाध्यक्ष MGP Ingradients Inc. अमेरिका, सचिन आयाचित, राष्ट्रीय व्यवस्थापक फेअर फार्म, ऑरगॅनिक सर्टिफिकेशन्स, कृषि मंत्रालय, ऑस्ट्रेलिया व स्मिता पाटील (IFS) कॉन्सुल जनरल, भारतीय दूतावास मॉस्को, रशिया यांना Online “कृषि सन्मान पुरस्कार २०२५” गौरविण्यात आले तसेच कै. डॉ. एम. एस. स्वामीनाथन मेमोरियल व्याख्यान हे “शेतीविषयक आव्हाने व संधि” यावर कृषिरत्न अनिलशेठ मेहेर – नारायणगाव अध्यक्ष कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कृषि महाविद्यालय पुणे येथून CGPA ने B.Sc (Agri), B.Sc (Horti) व MBA मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती प्रा. डॉ. जनार्दन कदम उपाध्यक्ष यांनी सांगितली. पुणे येथून मे २०२४ मध्ये B.Sc (Agri) ला CGPA ने प्रथम क्रमांक आलेली कु. साक्षी नितीन निंबाळकर - बारामती, B.Sc (Horti) CGPA ने प्रथम क्रमांक आलेली कु. प्राची अरुण महाकाल – नारायणगाव व MBA मध्ये CGPA ने प्रथम आलेली कु. श्रेया हनुमंत फडतरे – फलटण यांचा सत्कार डॉ. राजाराम देशमुख माजी कुलगुरू व डॉ. शंकरराव मगर माजी कुलगुरू यांच्या हस्ते करण्यात आला. त्याच बरोबर प्रत्येक विद्यार्थ्यास कै. वामनराव महादेव मोहिते – फलटण स्मृति पुरस्कार रु. ५०००/- रोख बक्षीस श्री. हनुमंतराव मोहिते  यांच्या तर्फे देण्यात आला. 

या कार्यक्रमास बरेच जेष्ठ सनदी अधिकारी आले होते प्रदीप रासकर (IPS) Rtd. Sp.I.G.P. पुणे, रघुनाथ देवरे (IPS) Rtd. Sp.I.G.P. पुणे यांनी हजर राहून मार्गदर्शन केले त्याच बरोबर सुदाम आडसूळ, माजी कृषि संचालक प्रा. डॉ. डी. एल. साळे, माजी अधिष्ठाता परभणी, मा. अजित चौगुले विसमा, प्रा. डॉ.विश्वनाथ शिंदे, विभाग प्रमुख – राहुरी इ. जेष्ठ शास्त्रज्ञांनी हजर राहून मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. जनार्दन कदम, उपाध्यक्ष श्री. अतुल मारणे – सचीव, रवींद्र पवार, श्रीनिवास खर्चे, नेताजी पवार व सर्व कार्यकारी सदस्यांनी विशेष प्रयत्न केले. तर बाबा नाईकडे (IFS) यांनी उत्कृष्ठ सुत्रसंचालन केले.   

Web Title: pune agriculture college ex student group alumni 37 anniversary programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.