Amba Niryat : निर्यातक्षम आंबा उत्पादनासाठी Mango Export), आंबा बागेची नोंदणी करणे, योग्य जाती निवडणे, योग्य व्यवस्थापन, काढणीपश्चात व्यवस्थापन आणि निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया करणे आवश्यक असते.
शिवाय अपेडाच्या मँगोनेट (APEDA) प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी (Amba Bag Nondni) करणे आवश्यक आहे, जेणेकरून निर्यातीसाठी आवश्यक परवानग्या मिळतील. आजच्या भागातून शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, हे पाहुयात....
निर्यातक्षम आंबा उत्पादनाकरिता शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी :
- निर्यातक्षम आंबा बागेची नोंदणी संबंधित जिल्हा कृषि अधिकारी कार्यालयामार्फत विहित मुदतीत करून घ्यावी.
- नोंदणीकृत आंबा बागेमध्ये किडी व रोगांचे नियंत्रण करण्याकरिता वापर करण्यात आलेल्या पीक संरक्षण औषधांचा अभिलेख ठेवणे. तसेच कीड व रोगांचे नियंत्रणाकरिता लेबल क्लेम औषधांचा वापर करणे.
- फळमाशी ही प्लांट क्वारंटाईन पेस्ट असल्याने तिच्या नियंत्रणाकरिता कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने फेरोमन ट्रॅपचा वापर करून फळमाशीच्या नियंत्रणाकरिता शिफारस केलेल्या लेबल क्लेम औषधांचा वापर करून नियंत्रण करणे,
- आंबा फळाचा दर्जा हा वजन, आकार, रंग यावर ठरविला जात असल्याने अशा दर्जाची फळे जास्तीत जास्त उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित करणे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी