Pradhanmantri Poshan Nirman Yojana : देशातील बालकांना चांगला आहार मिळवा यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत देशातील कोट्यवधी बालकांना मोफत आहार दिला जात आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे शालेय पोषण आहार योजना सुरू केली होती. मात्र, आता या योजनेचे नामकरण करण्यात आले असून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (Pradhanmantri Poshan Shakti Nirman Yojana) असे करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याच्या दृष्टीने तसेच प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमा वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना १५ ऑगस्ट १९९५ पासून राज्यात सुरू करण्यात आली होती.
केंद्र सरकारने या योजनेच्या नावात बदल करून 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना' असे करुन २०२१-२२ ते २०२५-२६ या पंचवार्षिक आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्यानुसार आता राज्यात शालेय पोषण आहार ही योजना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण म्हणून ओळखली जात आहे. देशातील बालकांना चांगला आहार मिळावा. यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू केली आहे. याअंतर्गत देशातील कोट्यवधी बालकांना मोफत आहार दिला जाणार आहे.केंद्र सरकारची ही योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की, शाळांमध्ये मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असणे आणि त्यांना चांगले शिक्षण आणि पोषण मिळावा. यातून उद्याचे चांगले विद्यार्थी घडविणे असा आहे.
या योजनेच्या माध्यमातून शाळेत शिकणारे विद्यार्थीही स्वावलंबी होणार असून त्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. या योजनेंतर्गत शाळांमध्ये प्राथमिक वर्गात शिकणार्या मुलांना केंद्र सरकारकडून पोषण आहार दिला जात आहे.
काय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना?
* गरीब कुटुंबातून आलेल्या मुलांच्या मध्यान्न भोजन दिले जाते. यामुळे लाखो गरीब मुलांना फायदा होत आहे. केंद्र सरकारने, देशातील जवळपास ११ लाख कोटींपेक्षा जास्त विद्यार्थांना या योजनेचा लाभ होत आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार १ लाख ७१ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत.
* सदर योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो.
* योजनेतंर्गत इ. १ ली ते ५ वीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यासाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त आहार दिला जातो.
तसेच इ. ६ वी ते इ.८ वीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो.
* त्याच बरोबरच यात अन्नधान्य, तृणधान्यांचा आहारात समावेश केला जातो.
* विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्यता आणून विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार अधिक आवडीने खातील.
* तीन संरचित आहार पध्दतीमध्ये तांदूळ, डाळी / कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य (स्प्राऊिस) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर अथवा नाचणीसत्व यांचा समावेश करुन नविन पाककृती तयार करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.
परसबागेची निर्मिती
योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबाग निर्माण करण्यात येत आहेत. शालेय परसबागेत उत्पादित भाजीपाला व फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने विद्यार्थ्यांना ताजा सकस आहार मिळण्यास मदत होत आहे. त्यामुळे आता अनेक शाळेच्या परसबागेत आपल्याला विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे दिसतात.
प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये परसबाग तयार करायची असते. या परसबागेतून विद्यार्थ्यांना पौष्टिक व सकस भाजीपाला पोषण आहारातून मिळावा व त्यांचे आरोग्य चांगले राहावे, हा शासनाचा उद्देश आहे.
भांबोराची जि. प. शाळा शालेय परसबाग स्पर्धेत प्रथम
मोर्शी येथील स्थानिक पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय शालेय परसबाग स्पर्धेत भांबोरा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकावून तालुक्यामध्ये मानाचे स्थान प्राप्त केले आहे.
भांबोरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परसबागेमध्ये विविध प्रकारच्या वेलवर्गीय भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या, औषधी वनस्पती आदींची लागवड केली आहे.
या परसबागेचे वैशिष्ट्य म्हणजे, ही संपूर्ण परसबाग सेंद्रिय खतावर वाढवलेली असून यामध्ये कुठल्याच रासायनिक खताचा वापर केलेला नाही. यातून मुलांच्या अंगी निसर्गाविषयी प्रेम, संघटन कौशल्य व श्रमाविषयी आवड अशा गुणांची वाढ या उपक्रमातून झालेली आहे. मुख्याध्यापिका कल्पना भोजने, सहायक शिक्षक लीलाधर मासोदकर, सहायक शिक्षिका संध्या भोनखडे व प्रशिक्षक मयुरी ढोक यांनी कल्पकतेतून ही परसबाग साकारली आहे. सरपंच अनिल इखे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती, गावातील पालकवर्ग यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले.