Join us

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २० वा हप्ता लवकरच खात्यावर जमा होणार; यादीत तुमचे नाव कसे चेक कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 10:39 IST

PM Kisan 20th Installment Date : Pm Kisan Hapta पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM Kisan Scheme योजनेचा २० वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, २० जून रोजी हा हप्ता जारी केला जाऊ शकतो. पण, अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. केंद्र सरकार या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत देते.

पंतप्रधान मोदींनी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या बिहार दौऱ्यात या योजनेचा १९ वा हप्ता शेवटचा जारी केला होता, आणि तेव्हापासून शेतकरी २० व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

तर पैसे मिळणार नाहीतपीएम किसान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) लाभ मिळवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ओटीपी आधारित ई-केवायसी (eKYC) करणे आता अनिवार्य आहे. जर तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल, तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.

पीएम किसान यादीत तुमचे नाव कसे चेक कराल?◼️ तुम्हाला २० वा हप्ता मिळणार की नाही, हे तपासणे खूप सोपे आहे.◼️ सर्वात आधी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.◼️ वेबसाइटवर 'लाभार्थी यादी' (Beneficiary List) लिहिलेल्या मोठ्या बॉक्सवर क्लिक करा.◼️ आता तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे.◼️ सर्व माहिती भरल्यानंतर 'गेट रिपोर्ट' (Get Report) वर क्लिक करा.◼️ तुमच्या स्क्रीनवर सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, जिथे तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

अधिक वाचा: राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय, महाॲग्री-एआय धोरणाला मंजुरी; कसा होणार शेतीला फायदा?

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेतकरीशेतीपंतप्रधानसरकारकेंद्र सरकारकृषी योजनासरकारी योजना