राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२५ साठी ई-पीक पाहणीची प्रक्रिया दि. १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. महसूल विभागाने विकसित केलेल्या 'ई-पीक पाहणी मोबाईल 'अॅप'च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतः करता येते.
दिनांक १ ऑगस्ट २०२५ ते १४ सप्टेंबर २०२५ पर्यंत खरीप हंगाम २०२५ करीता ई-पीक पाहणी सुरु होती. परंतु राज्यात काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी, दुबार पेरणी, इ. कारणांमुळे शेतकरी ई-पीक नोंदणी करू शकले नाही.
याकारणास्तव शेतकरी पीक नोंदणी करण्यापासून वंचित राहू नये याकरिता शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीसाठी दिनांक २० सप्टेंबर २०२५ पर्यंत (सहा दिवस) मुदतवाढ देण्यात येत आहे.
तद्नंतर उर्वरित शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी दिनांक २१ सप्टेंबर २०२५ ते ४ नोवेंबर २०२५ पर्यंत सहायक स्तरावरून पूर्ण करता येईल.
ही माहिती राज्य संचालक, महसूल माहिती तंत्रज्ञान कक्ष, जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे यांच्या पत्राने सर्व विभागस्तरावर प्रसारित करण्यात आली आहे.
अधिक वाचा: ग्रामीण शेतरस्ते, पाणंद रस्ते, शिव रस्त्यांचे होणार डिजिटल अभिलेख; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?