Lokmat Agro >शेतशिवार > Organic Fertilizer : अखेर एफआयआर झाला दाखल; अवैध खत विक्री प्रकरण वाचा सविस्तर

Organic Fertilizer : अखेर एफआयआर झाला दाखल; अवैध खत विक्री प्रकरण वाचा सविस्तर

Organic Fertilizer : Finally an FIR has been filed; Read the details of the illegal fertilizer sale case | Organic Fertilizer : अखेर एफआयआर झाला दाखल; अवैध खत विक्री प्रकरण वाचा सविस्तर

Organic Fertilizer : अखेर एफआयआर झाला दाखल; अवैध खत विक्री प्रकरण वाचा सविस्तर

Organic Fertilizer : हिवरखेड येथे अनधिकृतपणे (Unofficially) साठवणूक केलेला ६०० बॅग सेंद्रिय खतांचा साठा (Stock of organic fertilizers) कृषी विभागाचे पथकाने ८ जानेवारीला सील केले. वाचा सविस्तर

Organic Fertilizer : हिवरखेड येथे अनधिकृतपणे (Unofficially) साठवणूक केलेला ६०० बॅग सेंद्रिय खतांचा साठा (Stock of organic fertilizers) कृषी विभागाचे पथकाने ८ जानेवारीला सील केले. वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

'लोकमत ऍग्रो'इम्पॅक्ट

अमरावती : हिवरखेड येथे अनधिकृतपणे (Unofficially) साठवणूक केलेला ६०० बॅग सेंद्रिय खतांचा साठा (Stock of organic fertilizers) कृषी विभागाचे पथकाने ८ जानेवारीला सील केल्यानंतर एफआयआर दाखल करणे क्रमप्राप्त होते.

मात्र विविध कारणांनी टाळाटाळ केली जात होती. याबाबतचे वृत्त 'लोकमत ऍग्रो'द्वारा बुधवारी (२२ जानेवारी) रोजी जनदरबारात मांडताच पथकाला जाग आली व मोर्शी ठाण्यात कृषी अधिकारी राहुल चौधरी यांनी कंपनीचे एमडी, विक्रेत्यासह पाच जणांविरोधात बुधवारी तक्रार नोंदविली.

१०५० रुपयांच्या बॅगची ६०० रुपयांत विक्री

* सील करण्यात आलेल्या सेंद्रीय खताचे बॅगवर एमआरपी १०५० रुपये असे अंकित आहे. प्रत्यक्षात ४० किलोची ही बॅग ६०० ते ७०० रुपये याप्रमाणे या परिसरातील संत्रा उत्पादकांना विक्री करण्यात आल्याची माहिती आहे.

* नीलेश भेले याने हिवरखेड येथे लोणी मार्गावरील एका घरात खतांची विक्री करण्यासाठी २ हजार रुपये महिना याप्रमाणे भाड्याने घेतले होते व तेथूनच हा गोरखधंदा सुरू होता. त्याच्याकडे साठवणूक व विक्रीचा परवाना नसल्याचे कारवाई करण्यात आली.

कंपनी, विक्रेत्याविरोधात तक्रार

खत नियंत्रण आदेश १९८५ चे खंड १९ चे उल्लंघन झाल्याने मिलेनिया ॲग्रो लाइफ कंपनी, नीलेश पोरवाल (भागीदार व एमडी, सांगली), परेश पोरवाल (भागीदार) आप्पासाहेब थोरात (एमडी, सांगली), नीलेश भेले (विक्रेता, अंजनगाव सुर्जी) विरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम उल्लंघनाची तक्रार दाखल मोर्शी पोलिस ठाण्यात दाखल आहे.

५०० बॅग नमुन्याचा अहवाल आला अप्रमाणित

कंपनीच्या सेंद्रिय खतांचे दोन नमुने ८ जानेवारीला प्रयोगशाळेत तपासणीला पाठविले होते. त्यापैकी एका नमुन्याचा अहवाल अप्रमाणित आलेला आहे.

हे ही वाचा सविस्तर : organic fertilizer : मोर्शी तालुक्यात सेंद्रिय खताचा अवैध साठा प्रकरणी एफआयआर केव्हा? वाचा सविस्तर

Web Title: Organic Fertilizer : Finally an FIR has been filed; Read the details of the illegal fertilizer sale case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.