Lokmat Agro >शेतशिवार > Organic farming : मेळघाटातील शेतीला जैविक कुंपणाचे संरक्षण वाचा सविस्तर

Organic farming : मेळघाटातील शेतीला जैविक कुंपणाचे संरक्षण वाचा सविस्तर

Organic farming : Read more about the protection of biological fences for agriculture in Melghat | Organic farming : मेळघाटातील शेतीला जैविक कुंपणाचे संरक्षण वाचा सविस्तर

Organic farming : मेळघाटातील शेतीला जैविक कुंपणाचे संरक्षण वाचा सविस्तर

Organic farming : शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी उपयुक्त ठरलेले जैविक कुंपण आता मेळघाटात त्याची लागवड केली असून, काजलडोह येथील प्रगतिशील महिला शेतकरी इंदिरा उईके यांनी हा अभिनव प्रयोग केला आहे. वाचा सविस्तर

Organic farming : शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी उपयुक्त ठरलेले जैविक कुंपण आता मेळघाटात त्याची लागवड केली असून, काजलडोह येथील प्रगतिशील महिला शेतकरी इंदिरा उईके यांनी हा अभिनव प्रयोग केला आहे. वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

चिखलदरा : शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी उपयुक्त ठरलेले जैविक कुंपण (Biological Fencing) आता मेळघाटात त्याची लागवड (Cultivation) केली असून, काजलडोह येथील प्रगतिशील महिला(Women) शेतकरी इंदिरा उईके यांनी हा प्रयोग केला.

राज्यभर आता या जैविक कुंपणाची सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम अकोट तालुक्यातील शेतकरी जगन बगाडे यांनी हा यशस्वी प्रयोग करूनच राज्याला एक नवी दिशा दिली होती.

बळीराजाला पीक पेरणीपासून ते कापणीपर्यंत संरक्षणासाठी विविध टप्प्यांवर त्रास सहन करावा लागतो.

त्यामुळे जैविक कुंपणाचा शोध खापरवाडी बु, येथील प्रयोगशील शेतकरी जगन बगाडे त्यांनी लावला. त्या कुंपणाच्या लागवडीसंदर्भात चित्रफीत गावागावांत दाखवली शेतकऱ्यांच्या पसंतीला ते आता कुंपण उतरले आहे.

त्यामुळे मेळघाटातही वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी महिला बचत गटाच्या पुढाकाराने लागवड सुरू झाली आहे.

काजलडोह येथील निमंत्रक इंदिरा कुंवरसिंग उईके यांच्या शेतीच्या बांधावर जैविक कुंपण म्हणून निवडुंगाची लागवड इर्जिक पद्धतीने केली आहे.

सरपंच राजेश कवडे, उपसरपंच राजेश आठोले, शेतकरी गणेश राठोड व शेतकरी गटातील महिला व पुरुष उपस्थित होते. पाणी फाउंडेशनचे सचिन लांडे व सहकारी यांनी याकरिता परिश्रम घेतले.

असे आहे जैविक कुंपण

*  जैविक वनस्पतीचे कुंपण सरळ वाढणारे काटेरी निवडुंग आहे. त्याला पेरकूटही म्हणतात. त्याला विषारी काटे येतात. त्यामुळे जंगली जनावरे यांच्याजवळ फिरकत नाहीत.

* पेरकूटची शेताच्या बांधावर किंवा नदी, नाला, ओढा किंवा शेतरस्ता व बांधावर लागवड केल्याने काही वर्षातच शेताच्या बांधावर एक भिंत तयार होते. त्यामुळे जंगली जनावरे, श्वापदे शेताच्या अवतीभोवती येत नाहीत आणि पिकांचे संरक्षण होते.

* मेळघाटसह राज्यातील अनेक शेतकरी गट एकत्र येऊन या जैविक कुंपण म्हणून निवडुंगाची लागवड करीत आहेत.

हे आहेत जैविक कुंपणाचे फायदे

• कमी खर्च, कमी मेन्टेनन्स, कमी पाण्यात येणारे

• जंगली जनावरांपासून पिकांचे हमखास संरक्षण

• पाळीव जनावरे व माणसांना सुरक्षितः

• निसर्गपूरक हिरवी पाने बकऱ्या आवडीने खातात.

• पेरकूट वाळल्यावर सुद्धा बकऱ्या खातात.

• जैविक कुंपणाच्या भिंतीमुळे शेजारच्या शेतातून किडी येण्यास प्रतिबंध.

• पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण

• कुंपणाला लागून भाजीपाल्याचे वेल लावता येतात. यामध्ये आपण कारले, दोडके, वाल, कुयरी, भोपळा आदी वेलवर्गीय भाजी पिके घेऊ शकतो.

हे ही वाचा सविस्तर : Godavari River Water : 'नांमका'च्या कालव्याचे काम पूर्णत्वास जाईना काय आहे कारण ते वाचा सविस्तर

Web Title: Organic farming : Read more about the protection of biological fences for agriculture in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.