अहिल्यानगर: आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना केरोसीन दिले जाणार आहे.
केरोसीन वाटपाच्या नियोजनासाठी शासनाकडून जिल्हा पुरवठा विभागासोबत सातत्याने बैठक घेऊन आढावा घेतला जात आहे.
सोमवारी झालेल्या ऑनलाईन आढावा बैठकीत राज्य शासनाने पुरवठा विभागाला तालुका व गावनिहाय लाभार्थी यादी सादर करण्याची सूचना केली आहे. साधारणपणे ६० ते ७० रुपये प्रति लिटरने लाभार्थ्यांना केरोसीन मिळण्याची शक्यता आहे.
इराण-इस्रायल, अमेरिका युद्धाचे परिणाम पुढील काही वर्ष भारतात जाणवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले.
या युद्धाचा सर्वात मोठा परिणाम गॅस सिलिंडरसह पेट्रोल, डिझेलवर होणार आहे. त्यामुळे शासनाने अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना केरोसीन देण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाने जिल्हा पुरवठा विभागाला जिल्ह्यातील केरोसीन वितरण आणि पुरवठा व्यवस्थेबाबत सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते.
जिल्ह्यातील केरोसीन वाटपाबाबत सोमवारी जिल्हा पुरवठा विभागाने राज्य शासनाला जिल्ह्यातील घाऊक केरोसीन विक्रेत्यांसह तहसीलदार यांचा अभिप्राय सादर केला.
जिल्ह्यातील ४५ पैकी अवघ्या ८ ते १० घाऊक विक्रेत्यांनी केरोसीन पुरवठा करण्याची तयारी दर्शवली असून, अनेकांनी केरोसीन वितरणासाठी टँकर व साठवण सुविधा नसल्याचे कारण दिले आहे.
तसेच लाभार्थ्यांनी रास्त दरात केरोसीन उपलब्ध झाल्यास वापर करण्यास इच्छुक असल्याचे सर्वेक्षणात सांगितले आहे.
युद्धाचा सर्वात मोठा परिणाम गॅस सिलिंडरसह पेट्रोल, डिझेलवर होणार आहे. त्यामुळे शासनाने अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना केरोसीन देण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यासाठी १ लाख लिटर केरोसीन◼️ राज्य शासनाने जिल्ह्यातील तालुका आणि गावनिहाय केरोसीनची मागणी करण्याची सूचना केली आहे.◼️अहिल्यानगर जिल्ह्यासाठी राज्य शासनाकडून ८० हजार ते १ लाख लिटर केरोसीन मिळणार आहे.◼️ या केरोसीनचे अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील सात लाख लाभार्थ्यांना वाटप केले जाणार आहे.
अधिक वाचा: रॉकेल वाटप नक्की कुठून होणार? पेट्रोल पंप की रेशन दुकानातून? जाणून घ्या सविस्तर
Web Summary : Amidst global conflict, Maharashtra will distribute kerosene to Antyodaya and priority households, likely at ₹60-70/liter. With potential fuel price hikes due to ongoing wars, the government is preparing kerosene distribution through ration shops. Ahilyanagar district is set to receive 80,000 to 1 lakh liters.
Web Summary : वैश्विक संघर्ष के बीच, महाराष्ट्र अंत्योदय और प्राथमिकता वाले परिवारों को मिट्टी का तेल वितरित करेगा, जिसकी कीमत ₹60-70/लीटर होने की संभावना है। जारी युद्धों के कारण ईंधन की कीमतों में संभावित वृद्धि के साथ, सरकार राशन की दुकानों के माध्यम से मिट्टी के तेल के वितरण की तैयारी कर रही है। अहिल्यानगर जिले को 80,000 से 1 लाख लीटर मिलने की उम्मीद है।