Join us

Orange Cultivation: सिंचन सुविधेमुळे संत्र्याच्या लागवडीत 'इतक्या' हेक्टरने वाढ; कसा होणार फायदा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 16:09 IST

Orange Cultivation : सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहेत. गेल्या एक वर्षात अकोला जिल्ह्यात फळबागांच्या लागवडीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांंचा कसा होणार फायदा ते वाचा सविस्तर.

अकोला जिल्ह्यात सिंचनाची (Irrigation ) सुविधा निर्माण झाल्याने शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहेत. गेल्या एक वर्षात जिल्ह्यात तीनशे हेक्टरने संत्रा फळबागांच्या लागवडीत (Orange Cultivation) वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील संत्र्याची बांगलादेशात निर्यात होत असून, भावही चांगला मिळत आहे. जिल्ह्यात १३ हजार ६३४ हेक्टरवर फळबागांची लागवड करण्यात आली आहे.

कपाशी, सोयाबीन, तूर या परंपरागत पिकांच्या भावात वाढ होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत, तसेच तन्य प्राण्यांचा त्रास, अतिवृष्टीमुळे अनेकदा पिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी पर्यायी पिकांच्या शोधात होते.

विविध प्रकल्प व विंधन विहिरींमुळे जिल्ह्यात सिंचनाची (Irrigation) सुविधाही निर्माण झाली आहे. शेतकरी फळबागांकडे वळले आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक संत्राबागांची लागवड (Cultivation) करण्यात आली आहे. जिल्ह्यात २०२३-२४ पर्यंत ६,५३२ हेक्टरवर संत्राबागा होत्या, तर गेल्या एक वर्षांत संत्रा बागांच्या लागवडीत ३०० हेक्टरने वाढ झाली असून, ६,८५० हेक्टरवर शेतकरी संत्र्याचे पीक घेतात. संत्र्याच्या तुलनेत अन्य फळबागांची लागवड कमी प्रमाणात करण्यात आली आहे.

समृध्दीमुळे बाजारपेठेत वेळेत पोहोचणे शक्य

* वाशिम तसेच बुलढाणा जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग गेला आहे. या मार्गामुळे शेतमाल बाजारपेठेत (Market) वेळेच्या आत पोहोचणे शक्य होते. पूर्वी जास्त वेळ लागत होता.

* रस्त्याची दुरवस्था असल्याने संत्र्याचा (Orange) दर्जा ढासळत होता, तसेच संत्र्याची वाहतूक सोयीची झाली आहे. त्यामुळे संत्र्याची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने भावही चांगले मिळत आहेत.

प्रक्रिया प्रकल्प वाढले

* देशभरात संत्र्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प वाढले आहेत. संत्र्यावर प्रक्रिया करून त्यापासून विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अकोल्यातील संत्र्याला देशभरातून मागणी वाढली आहे.

* ६, ८५० हेक्टरवर संत्र्याच्या फळबागा जिल्ह्यात आहेत. मागीलवर्षी ६,५३२ हेक्टरवर संत्र्याच्या फळबागा होत्या, यामध्ये एका वर्षात ३०० हेक्टरने वाढ झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक फळबागा संत्र्याच्या आहे.

बांगलादेशात होते संत्र्याची निर्यात

* अकोला जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या संत्र्याची देशभरात मागणी वाढली आहे. जम्मू-काश्मीर, दिल्ली येथे संत्रा पाठविण्यात येतो. तसेच बांगलादेशात संत्र्याची निर्यात (Export) केली जाते. संत्र्याची मागणी देशभरात असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे.

देशभरातून संत्र्याची मागणी जास्त आहे, तसेच संत्र्यावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग गेल्या काही वर्षांमध्ये सुरू झाल्याने भावात वाढ झाली आहे. समृद्धी महामार्गानेही बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. शेतकरी संत्रा लागवडीकडे वळले आहेत.  - विलास वाशिमकर, तंत्र अधिकारी, फलोत्पादन, कृषी विभाग

जिल्ह्यातील फळबागा क्षेत्र

फळबाग      २०२३-२४२४-२५
केळी          २,५९१    २,७३१
सीताफळ        १५७.५  १७२
जांब                   ७८८८
आंबा          ५६.२  ६१
पपई          १२९.५  १४२
लिंबू              २,१९९२,३१०
टरबूज    १,०२२      १,०७३
खरबूज         १२७    १२७

हे ही वाचा सविस्तर : Bird flu: कावळ्यांद्वारे 'बर्ड फ्ल्यू' धडकला ! काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीअकोलासमृद्धी महामार्गफळेशेतकरीशेतीपाटबंधारे प्रकल्प