Join us

शेतकऱ्यांच्या विदेश अभ्यास दौऱ्यासाठी प्रवासी कंपनी निवडण्याकरीता ऑनलाईन टेंडर निघाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:58 IST

Farmer Foreign Tour Scheme राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात/कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी याचा अभ्यास करणे.

राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात/कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी याचा अभ्यास करणे.

तसेच कृषीमाल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर/शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे.

विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून समजून घेणे.

तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थाना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन २०२५-२६ ही योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत युरोप, इस्राईल, जपान, चीन, दक्षिण कोरिया व मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स या देशांत शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करण्याकरिता प्रवासी कंपनीची निवड करावयाची आहे.

या योजनेंतर्गत GeM पोर्टलवर दि. १४ जुलै, २०२५ रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या निविदा प्रक्रियेंतर्गत दि. १८ जुलै, २०२५ रोजी निविदापूर्व सभा राजमाता जिजाऊ समिती सभागृह, कृषी आयुक्तालय, दुसरा मजला, मध्यवर्ती इमारत, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. 

निविदा सादर करण्याची अंतिम मुदत दि. २५ जुलै, २०२५ रोजी दु. १२.०० वाजेपर्यंत आहे. GeM पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आलेल्या देशनिहाय निविदांचे क्रमांक खालीलप्रमाणे

अ.क्र.दौरा देशदौऱ्याचे एकूण दिवसनिविदा क्रमांक
युरोप१२GEM/2025/B/6443685
इस्राईल०९GEM/2025/B/6443752
जपान१०GEM/2025/B/6443819
मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स१२GEM/2025/B/6443399
चीन०८GEM/2025/B/6443459
दक्षिण कोरिया१०GEM/2025/B/6443596

अधिक वाचा: शेत रस्त्यांचे वाद मिटणार; आता रस्त्यांची कायदेशीररीत्या सातबाऱ्यावर 'या' ठिकाणी होणार नोंद

टॅग्स :शेतकरीशेतीपीककाढणी पश्चात तंत्रज्ञानराज्य सरकारकृषी योजनासरकारजपानइस्रायलचीनदक्षिण कोरियाभारत