सोलापूर : ओंकार साखर कारखाना युनिट १५, रुद्देवाडी ऊस गाळपाला यशस्वीपणे सुरुवात झाली असून, साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले आहे.
गळीत हंगाम २०२५-२६ चे गाळप सुरू होताच ओंकार ग्रुपने ऊस बिलापोटी तब्बल २२ कोटी रुपयांचे बील अदा केले आहे.
यंदाच्या हंगामात अक्कलकोट तालुक्याच्या इतिहासातील सर्वोच्च ३००० रुपये मार्चनंतर ३१०० व एप्रिलनंतर ३२०० ऊस दर देण्याचा निर्णय ओंकार ग्रुपने घेतला आहे.
ओंकार ग्रुपच्या परंपरेनुसार टनेजनुसार दीपावलीला मोफत साखर देणार असल्याची माहिती चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांनी दिली.
ओंकार ग्रुपचे दोन साखर कारखाने कार्यरत असून, या दोन्ही कारखान्यांमध्ये दैनंदिन सुमारे ११ हजार मे.टन ऊस गाळप केले जात आहे.
दोन्ही कारखान्यांवर सध्या गाळप क्षमतेपेक्षा जास्त ऊस उपलब्ध असल्याने जॅमिंगची परिस्थिती असली तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये किंवा ऊस घालण्याची घाई करू नये, असे आवाहन बाबूराव बोत्रेपाटील यांनी केले.
सध्या ओंकार ग्रुप अंतर्गत एकूण २१ साखर कारखाने कार्यरत आहेत. सर्व कारखान्यांमध्ये शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत लवकरात लवकर पूर्ण पेमेंट व ऊस गाळप करण्याचे धोरण राबविले जात आहे.
ओंकार ग्रुपची ही भूमिका केवळ उद्योगापुरती मर्यादित नसून, शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठीचा सकारात्मक व आदर्श प्रयत्न असल्याची भावना यावेळी बोत्रेपाटील यांनी व्यक्त केली.
अधिक वाचा: वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाले तर वन विभागाकडून कशी दिली जाते भरपाई? वाचा सविस्तर
Web Summary : Omkar Sugar Group announced sugarcane rates: ₹3000 (March), ₹3100 (after March), ₹3200 (after April). ₹22 crore already paid to farmers. Two plants process 11,000 MT daily. Free sugar for farmers during Diwali.
Web Summary : ओंकार शुगर ग्रुप ने गन्ने की दरें घोषित कीं: ₹3000 (मार्च), ₹3100 (मार्च के बाद), ₹3200 (अप्रैल के बाद)। किसानों को पहले ही ₹22 करोड़ का भुगतान किया गया। दो संयंत्र प्रतिदिन 11,000 मीट्रिक टन संसाधित करते हैं। दिवाली के दौरान किसानों के लिए मुफ्त चीनी।