Nuksan Bharpai : राज्यामध्ये खरीप हंगाम (Kharif Season) 2024 मध्ये विविध भागांमध्ये अतिवृष्टी, पूर परिस्थिती यांमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि याच्यासाठी पिक विमा योजनेच्या (Pik Vima Yojana) अंतर्गत नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि परभणी या चार जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पिक विमासाठी अधिसूचना काढण्यात आलेली होती.
जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी ज्या ज्या भागातील शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होऊन त्या जिल्ह्यासाठी जे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. ते प्रस्ताव विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच मंजूर करण्यात आलेले होते. आणि ज्या जिल्ह्यांच्या प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले होते, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करून केवायसी प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अतिवृष्टीच्या वाटपाची प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.
आता केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर साधारणपणे पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. यामध्ये हिंगोली, नांदेड, यवतमाळ आणि परभणी जिल्ह्यांमधील अतिवृष्टीचे नुकसान भरपाई बाकी होती. हे वितरण सुरु होण्याची शक्यता आहे. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान होते. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या इतरही जिल्हे अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
इतर जिल्ह्यांमध्ये प्रस्तावित शासनाला प्राप्त झालेले तर त्या प्रस्तावाचे जीआर अद्याप आलेले नाही. आत्तापर्यंत ज्या ज्या जिल्ह्याचे जीआर आलेले आहेत आणि ज्या ज्या जिल्ह्यातूनशेतकऱ्यांच्या केवायसीच्या याद्या आलेल्या येतात, त्या त्या शेतकऱ्यांच्या केवायसी पूर्ण करून आता वितरणाच्या प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांचे यादीमध्ये नाव आले असेल त्यांनी केवायसी करणे आवश्यक आहे.
जुलै व ऑगस्ट, 2024 या कालावधीमध्ये शेतीपिकाच्या नुकसानीकरता वितरित करावयाच्या निधीचा तपशील
ऑगस्ट व सप्टेंबर, 2024 या कालावधीमध्ये शेतीपिकाच्या नुकसानीकरता वितरित करावयाच्या निधीचा तपशील