ग्रामीण भागातील शेतीचे यांत्रिकीकरण वाढविण्यासोबतच महिला बचतगटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकराच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत आता गावागावांत महिला बचतगटांच्या माध्यमातून कृषी अवजार बँका स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.
या योजनेंतर्गत पात्र गटांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या तब्बल ६० टक्क्यांपर्यंत, म्हणजेच कमाल २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. ग्रामीण भागात शेतीमध्ये काम करण्यास मजुरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
त्यामुळे पारंपरिक पद्धतीऐवजी शेतकऱ्यांचा कल यांत्रिकीकरणाकडे वाढला आहे. मात्र, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना महागडी कृषी यंत्रसामग्री खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.
त्यासाठी आता कृषी विभागाने गावस्तरावर अशी यंत्रे भाडेतत्त्वात्वर उपलब्ध करून देण्याचा भाग म्हणून हा नवा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे शेती कामांतील मजुरीचा खर्च कमी होऊन कामांना गती मिळणार आहे. पेरणीच्यावेळी ही सामग्री महत्त्वाचा भाग ठरणार आहेत.
महिला बचत गटांना संधी◼️ ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृषी अवजार बँक ही संकल्पना महत्त्वाची ठरत आहे.◼️ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा अंतर्गत महिला बचतगटांना या योजनेत प्राधान्य देण्यात येत असून, त्यांना व्यवसाय उभारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कुठे आणि कशी करायची नोंदणी अन् अर्ज?◼️ इच्छुक महिला बचत गटांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.◼️ अर्जासोबत बँकेचे तपशील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.◼️ अधिक माहितीसाठी वेबसाईट
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प◼️ कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाच्या वतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे.◼️ कृषी अवजारे बँकेसाठी प्रकल्प मूल्याच्या ६० टक्के अथवा जास्तीत जास्त अनुदान महिला बचत गटांना मिळणार आहे.
गावपातळीवर कृषी अवजार बँक स्थापणारगावपातळीवर शेतकऱ्यांना आधुनिक शेती अवजारे सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी अवजार बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणती अवजारे खरेदी करता येणार?योजनेंतर्गत निवड झालेल्या गटांना ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे, बीबीएफ यंत्र, रोपणी व लावणी यंत्र, मल्चिंग मशीन, कम्बाईन हार्वेस्टर, तसेच फवारणी पंप यासारखी आधुनिक कृषी यंत्रसामग्री खरेदी करता येणार आहे. त्या-त्या भागातील पीक पद्धतीनुसार आधुनिक यंत्र खरेदी करता येणार आहे.
अधिक वाचा: युद्धामुळे आंबा निर्यातीला मोठा ब्रेक; या आठवड्यात दरही उतरले; वाचा पेटीला काय मिळतोय दर?
Web Summary : Maharashtra offers up to ₹24 lakh subsidy for women's self-help groups to establish agricultural equipment banks. This initiative aims to boost rural mechanization, reduce labor costs, and provide affordable machinery to small farmers, enhancing agricultural productivity.
Web Summary : महाराष्ट्र सरकार महिला स्वयं सहायता समूहों को कृषि उपकरण बैंक स्थापित करने के लिए 24 लाख रुपये तक की सब्सिडी दे रही है। इस पहल का उद्देश्य ग्रामीण मशीनीकरण को बढ़ावा देना, श्रम लागत को कम करना और छोटे किसानों को सस्ती मशीनरी प्रदान करना है, जिससे कृषि उत्पादकता बढ़ेगी।