आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत को-ब्रँडेड कार्ड तयार करण्यासाठी १ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या दोन्ही योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रतिकुटुंब दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कवच उपलब्ध होत आहे. आता लाभार्थ्यांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत या दोन्ही योजनांसाठी आता देशभरात एकच आयुष्मान कार्ड देण्याचा निर्णय राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने घेतला आहे.
यासाठी आता लाभार्थ्यांनाही एकच कार्ड वापरून पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळू शकणार आहेत. एकत्रित कार्ड ई-केवायसीद्वारे बनवता येते. यासाठी आयुष्मान अॅप किंवा संबंधित सरकारी पोर्टलचा वापर करता येतो.
काय आहे 'को ब्रँडेड कार्ड'?
पूर्वी आयुष्मान आणि जन आरोग्य योजनेचे कार्ड वेगवेगळे होते. आता दोन्ही योजनेचे को ब्रँडेड कार्ड दिले जात आहे.
विशेष मोहीम सुरू
कार्डसाठी २० डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबवली जात आहे. इतरवेळीही कार्ड काढण्याची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे
कुठे आणि कसे काढायचे कार्ड?
आशा वर्कर्स, आरोग्य सेविका घराघरात जाऊन मोफत कार्ड काढून देत आहेत. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय, महा ई सेवा केंद्रातून कार्ड काढता येते.
राष्ट्रीय स्तरावरील ओळखपत्र
अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, ७० वर्षावरील ज्येष्ठांना या कार्डावर देशभरात कोठेही उपचार घेता येणार आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांनाही लाभ
कार्डवर दोन्ही योजनांतून उपचाराचा लाभ शासकीय कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे.
आरोग्य योजनांच्या लाभासाठी कार्ड आवश्यक
पात्र कुटुंबांना आरोग्य कवच मिळणार आहे. आरोग्य योजनांच्या लाभासाठी कार्डची आवश्यकता आहे.
अधिक वाचा: आता रेशनवर पुन्हा मिळणार साखर; राज्यातील 'या' रेशन कार्डधारकांना दीड वर्षानंतर साखरेचा लाभ
