Join us

आता गावातील विकास सोसायटीला उभा करता येणार कृषीमाल साठविण्यासाठी गोदाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 18:45 IST

प्राथमिक कृषी पतसंस्था त्यांच्या तालुक्यांचे आणि राज्याचे धान आणि गहू साठवण्याचे केंद्र तर बनतीलच, शिवाय शेतकऱ्यांना काही काळ त्यांचा माल गोदामात ठेवण्याचीही सोय होणार आहे.

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिलेल्या ‘पंतप्रधान साठवणूक’ सुविधेमुळे प्राथमिक कृषी पतसंस्था आता कमी भांडवलात आधुनिक गोदाम बांधू शकतात, असे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी सांगितले आहे. या प्राथमिक कृषी पतसंस्था त्यांच्या तालुक्यांचे आणि राज्याचे धान आणि गहू साठवण्याचे केंद्र तर बनतीलच, शिवाय शेतकऱ्यांना काही काळ त्यांचा माल गोदामात ठेवण्याचीही सोय होणार आहे. ते म्हणाले की पुढील तीन वर्षांत देशातील प्राथमिक कृषी पतसंस्थांकडे जगातील सर्वात मोठी साठवण क्षमता असेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. नवी दिल्लीत प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राच्या संचालनासाठी ५ राज्यांच्या प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांना स्टोअर कोड वितरण कार्यक्रमात बोलत होते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री मनसुख मांडवीय, सहकार राज्यमंत्री बी.एल. वर्मा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

परिसंवादाला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक कृषी पतसंस्थाना (पॅक्स) अन्य कामांशी जोडून आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि आज या उद्दिष्टाचा विस्तार करण्यात आला आहे. ते म्हणाले की, देशभरात २,३७३ पॅक्स स्वस्त औषधांची दुकाने म्हणजेच जन औषधी केंद्रे म्हणून स्थापन करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली हमी प्रत्यक्षात साकारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ते म्हणाले की, जनऔषधी केंद्रे बहुतांशी शहरी भागात आहेत, ज्याचा फायदा फक्त शहरातील गरिबांनाच मिळायचा आणि त्यांना १० ते ३० रुपयांपर्यंत परवडणाऱ्या किंमतीत औषधे मिळायची, पण आता पॅक्स च्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब आणि शेतकर्‍यांसाठीही स्वस्त दरात औषधे उपलब्ध होणार आहेत.

अमित शाह म्हणाले की, आज महाराष्ट्र, बिहार, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या देशाच्या विविध भागांतील पाच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांना प्रतिकात्मक प्रमाणपत्रेही देण्यात आली आहेत. सहकार मंत्रालयाने पुढील ५ वर्षांमध्ये २ लाख नवीन प्राथमिक कृषी पत संस्था (पॅक्स) तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि देशातील प्रत्येक गावातील प्रत्येक पंचायतीमध्ये अशी एक पतसंस्था असेल.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपंतप्रधाननरेंद्र मोदीअमित शाह