पुणे : राज्यात खासगी तत्त्वावर नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये उभारण्यासाठी तीन कंपन्यांनी तयारी दर्शविली असून, त्यांच्या प्रस्तावांची छाननी सुरू करण्यात आली आहे.
लवकरच हे कार्यालये सुरू करण्यात येणार असून पुणे शहरात तीन कार्यालय उभारण्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे नियोजन आहे. अशी माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक अभयसिंह मोहिते यांनी दिली.
दस्तनोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात होणारी गर्दी, अपुऱ्या सुविधा आणि त्यामुळे वेळेचा अपव्यय होता.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने यासाठी महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून खासगी संस्थांच्या माध्यमातून राज्यात ६० खासगी दस्तनोंदणी कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत.
या कार्यालयांतून नागरिकांना अत्याधुनिक आणि आरामदायक वातावरणात दस्तनोंदणीची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
ही कार्यालये पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर सुविधा पुरवणार आहेत. अशा कार्यालयांसाठी खासगी मदत घेण्यात येणार आहे.
अधिक वाचा: शक्तीपीठ महामार्ग आराखड्यात केले ‘हे’ मोठे बदल; कसा आहे नवीन आराखडा? वाचा सविस्तर
Web Summary : Maharashtra to speed up property registration with 60 new private offices. Three companies are preparing to launch these offices, offering modern facilities like passport offices. Pune will get three offices initially, reducing wait times and improving the registration experience for citizens.
Web Summary : महाराष्ट्र में 60 नए निजी कार्यालयों के साथ संपत्ति पंजीकरण में तेजी आएगी। तीन कंपनियां इन कार्यालयों को शुरू करने की तैयारी कर रही हैं, जो पासपोर्ट कार्यालयों जैसी आधुनिक सुविधाएं प्रदान करेंगी। पुणे को शुरू में तीन कार्यालय मिलेंगे, जिससे नागरिकों के लिए प्रतीक्षा समय कम होगा और पंजीकरण अनुभव बेहतर होगा।