Lokmat Agro >शेतशिवार > आता यंत्राने काढता येईल असे हरभरा वाण विकसित; उत्पादन देखील अधिक

आता यंत्राने काढता येईल असे हरभरा वाण विकसित; उत्पादन देखील अधिक

Now developed varieties of gram that can be harvested by machine; yeild also increased | आता यंत्राने काढता येईल असे हरभरा वाण विकसित; उत्पादन देखील अधिक

आता यंत्राने काढता येईल असे हरभरा वाण विकसित; उत्पादन देखील अधिक

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची कामगिरी

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची कामगिरी

शेअर :

Join us
Join usNext

राजरत्न सिरसाट

अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विविध पिकांचे सहा नवे पीक वाण विकसित केले असून, यात हेक्टरी २०.७६ क्विंटल उत्पादन देणाऱ्या सुपर जॅकी हरभरा वाणाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पिकाची यंत्राने काढणी करता येणार आहे.या वाणंना पेरणीसाठीची मंजूरी मिळाली आहे.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या 'ज्वॉइंट अॅग्रोस्को' डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात  पार पडला. यामध्ये चारही कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या २० नवीन वाणांना यामध्ये मंजुरी देण्यात आली आहे. यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या सहा नवीन वाणांचा समावेश आहे.

हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक असून, राज्यात या पिकाचे क्षेत्र जवळपास २५ लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे. परंतु अलीकडच्या काही वर्षात पावसाच्या अनियमितेसह मनुष्यबळाचा परिणाम या पिकाच्या पेरणीसह उत्पादनावर झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे हरभरा वाण विकसित केले आहे. 

इतर ६ वाण विकसित

याच सोबत धान साक्षी, मोहरी एसीएन-२३७, करडई एकेस ३५१, कुटकी यासह ग्लॅडिओलस हे फुलाचे नवे वाण विकसित केले आहे. या सर्व वाणांना ज्वॉइंट अॅग्रोस्कोमध्ये मंजुरी प्राप्त झाली असून, पेरणीसाठी प्रसारित करण्यात आले आहे.

नवीन हरभऱ्याचे हेक्टरी २०.७६ क्विंटल उत्पादन

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे हे वाण ९५ दिवसात येणारे असून, उत्पादन हेक्टरी २०.७६ क्विंटल एवढे आहे. विशेष म्हणजे यंत्राने तर काढता येणारच आहे. या पिकावर येणाऱ्या मर व करपा रोगास प्रतिबंधक आहे.

 

Web Title: Now developed varieties of gram that can be harvested by machine; yeild also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.