Join us

महाडीबीटी वरील शेतीच्या सर्व योजना दिसणार आता तुमच्या मोबाईलवर; डाउनलोड करा 'हे' मोबाईल अ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 09:48 IST

MahaVISTAAR-AI Mobile App शासनाच्या कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांसाठी एक नवीन अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. या अ‍ॅपला 'शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र' म्हणून ओळखले जाते.

शासनाच्या कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांसाठी एक नवीन अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. या अ‍ॅपला 'शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र' म्हणून ओळखले जाते. आता शेतकरी बांधवांना या एका अ‍ॅपमध्ये शेतीविषयक सर्व योजना आणि माहिती उपलब्ध आहे.

या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानासंबंधित माहिती, पीक सल्ला, पिकासाठी लागणाऱ्या खतांच्या मात्रांचा अंदाज, कीड आणि रोगांविषयी माहिती तसेच बाजारभाव पाहण्याची सुविधा मिळणार आहे.

या अ‍ॅपवर एका क्लिकवर शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर मिळवण्यासाठी त्यांच्या गावाच्या जवळपास असलेल्या अवजारे बँकांची माहितीदेखील उपलब्ध करून दिली आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि महाडीबीटीवर उपलब्ध असणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती विविध घटकांकरिता अर्ज कसा करायचा आणि कागदपत्रे कोणती याची माहिती या अ‍ॅपमध्ये आहे.

ऑनलाइन शेती शाळेमध्ये तंत्रज्ञानावरील व्हिडीओही या अ‍ॅपच्या माध्यमातून पाहता येतील. अशा अनेक सेवा या मोबाईल अ‍ॅपमध्ये दिल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या शंकांचे होणार निरसन◼️ शेतकरी बांधवांनी प्ले स्टोअरवरून 'महाविस्तार' अ‍ॅप डाउनलोड करावे.◼️ नंतर आपल्या शेतकरी आयडीने लॉग इन करून आपले नाव, गाव आणि तालुका प्रविष्ट करावे. त्यामुळे त्यांना गावनिहाय आणि तालुकानिहाय सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.◼️ अ‍ॅपच्या होम पेजवर शेतकऱ्यांना सर्व माहिती मिळेल तसेच नव्या गोष्टीविषयी विचारणा किंवा शेतकरी बांधवांच्या मनात निर्माण होणाऱ्या शंका आणि प्रश्न त्यांनी अ‍ॅपमधील 'मला प्रश्न विचारा' या विभागात विचारू शकतात आणि निराकरण मिळवू शकतात.

कृषी अधिकाऱ्यांशी साधा संपर्क◼️  या प्रकारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक एक सोबती आणि मित्र त्यांच्या मोबाइलमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.◼️  याचा जास्तीत जास्त फायदा शेतकरी बांधवांनी घ्यावा. या अ‍ॅपबाबत अधिक माहितीसाठी जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.

अधिक वाचा: ट्रॅक्टर व इतर शेती औजारे होणार स्वस्त, केंद्र सरकारचे नवे दरपत्रक जाहीर; कोणत्या औजारात किती सूट?

टॅग्स :शेतकरीशेतीराज्य सरकारसरकारमोबाइलकृषी योजनाडिजिटलऑनलाइन