Join us

Nira Bhima Sugar : नीरा भीमा कारखान्याचा हप्ता जाहीर; 'या' दिवशी होणार खात्यामध्ये जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 11:43 IST

Nira Bhima Sugar Factory : शहाजीनगर येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालू सन २०२४-२५ च्या ऊस गळीत हंगामासाठी ऊस बिलाचा हप्ता प्रतिटन २८०० प्रमाणे जाहीर केला आहे.

पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालू सन २०२४-२५ च्या ऊस गळीत हंगामासाठी ऊस बिलाचा हप्ता प्रतिटन २८०० प्रमाणे जाहीर केला आहे.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शुक्रवारी (दि. १०) वर्ग केला जाईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी दिली.

कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याने चालू गळीत हंगामामध्ये अखेर १.५ लाख टन ऊस गाळप पूर्ण केले आहे.

या गळीत हंगामामध्ये दि. १५ डिसेंबर अखेर गाळप झालेल्या ऊस बिलाची रक्कम शुक्रवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, अशी माहितीही लालासाहेब पवार यांनी दिली. निरा भीमा कारखान्याकडून चालू हंगामामध्ये गाळप होणाऱ्या उसाची बिले नियमितपणे शेतकऱ्यांना अदा केली जाणार आहेत.

तरी शेतकऱ्यांनी कारखान्यास गळितास जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार व संचालक मंडळाने केले आहे.

यावेळी विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, तानाजीराव नाईक, राजकुमार जाधव, प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Climate Change : हवामान बदलाचा परिणाम; गहू, तांदूळ महाग होईल सोबत पाण्याची टंचाईही येणार

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीशेतीपुणेशेती क्षेत्र