Lokmat Agro >शेतशिवार > New Research : 'करडई'च्या दोन नवीन वाणांना देशपातळीवर मान्यता; जाणून घ्या सविस्तर माहिती

New Research : 'करडई'च्या दोन नवीन वाणांना देशपातळीवर मान्यता; जाणून घ्या सविस्तर माहिती

New Research: latest news Two new varieties of 'Kardai' approved at the national level; Know detailed information | New Research : 'करडई'च्या दोन नवीन वाणांना देशपातळीवर मान्यता; जाणून घ्या सविस्तर माहिती

New Research : 'करडई'च्या दोन नवीन वाणांना देशपातळीवर मान्यता; जाणून घ्या सविस्तर माहिती

New Research : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित करडई (Kardai) संशोधन प्रकल्प विभागाने करडई संशोधन क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. (New Research)

New Research : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित करडई (Kardai) संशोधन प्रकल्प विभागाने करडई संशोधन क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. (New Research)

शेअर :

Join us
Join usNext

New Research : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित करडई (Kardai) संशोधन प्रकल्प विभागाने करडई संशोधन क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. (New Research)

विद्यापीठाने विकसित केलेल्या दोन नवीन करडई वाणांना केंद्र सरकारची अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) आणि पीबीएनएस १८४ या वाणांना केंद्रीय पीक गुणवत्ता, वाण अधिसूचना व प्रसारण समितीच्या ९३ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.   (New Research)

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये या वाणांच्या लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पीबीएनएस १८४ वाणाला झोन-२ अंतर्गत इतर प्रमुख करडई उत्पादक राज्यांमध्येही लागवडीसाठी मान्यता मिळाली आहे.  (New Research)

या वाणांच्या विकासामध्ये डॉ. एस.बी. घुगे, डॉ. आर. आर. धुतमल यांच्यासह प्रकल्पातील वैज्ञानिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. हे वाण करडई उत्पादनाच्या इतिहासात नवा अध्याय उघडवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) हे वाण १२४ ते १२६ दिवसांत परिपक्व होतात. यामध्ये ३०.९० टक्के तेलाचे प्रमाण असून, बाजारात त्याला चांगली मागणी आहे. पीबीएनएस १८४ हे वाण कोरडवाहू क्षेत्रात १२ ते १५ क्विंटल, तर बागायती क्षेत्रात १८ ते २० क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देतात.

या नव्या वाणांमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम आणि गुणवत्तापूर्ण पर्याय मिळणार असून, त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. या वाणांचे बियाणे लवकरच देशभरात उपलब्ध करून दिले जाईल.  - डॉ. इन्द्र मणी, कुलगुरू

हे ही वाचा सविस्तर : Agriculture News: अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा असा होणार फायदा वाचा सविस्तर

Web Title: New Research: latest news Two new varieties of 'Kardai' approved at the national level; Know detailed information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.