प्रत्येक नैसर्गिक गोष्टीचा आपण जीवनात वापर करत असतो. आजच्या काळात मनुष्य त्याचा गैरफायदा घेत आहे मनुष्याने त्यांच्या मर्यादा ओलांडून पर्यावरणाचा ऱ्हास करण्याकडे बोट ठेवले आहे. त्यामुळे पृथ्वीवरील वातावरण डबघाईला आलं आहे. या सर्व बाबींना कारण एकच आहे ते म्हणजे आपण वापरत असलेली ऊर्जा.
आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूसाठी ऊर्जा खर्च झालेली असते. प्रत्येक ऊर्जेमधून कार्बन डायऑक्साइड बाहेर पडत असतो म्हणजेच आपण प्रदूषण वाढीसाठी मदत केलेली असते.
आपण वापरत असलेल्या वस्तू पासून खूप मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साइड बाहेर पडत असतो. उदा. अनेक ठिकाणी थंड वातावरण करण्यासाठी वापरत असलेले एसी जर एक तास चालू असेल तर एक किलो कार्बन डायऑक्साइड त्यातून बाहेर पडतो व तो २०० ते ४०० वर्षासाठी वातावरणात अस्तित्वात राहतो.
त्यामुळे प्रत्येक वस्तू सांभाळून वापरले पाहिजे. यासाठी नैसर्गिक ऊर्जेच्या सहाय्याने आपल्याला लागणारी ऊर्जा निर्माण करावी लागेल. नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून ऊर्जा निर्माण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ''अक्षय ऊर्जा स्रोत''. अक्षय ऊर्जा म्हणजे अशी नैसर्गिक संसाधन जे पुन्हा पुन्हा ऊर्जा निर्माण करू शकतात.
जी मानवाच्या वापरावर नैसर्गिकरित्या पुन्हा भरली जातात व ती न संपणारी असतात. यामध्ये सूर्य, वारा, पाणी, भरती, ओहोटी यांचा समावेश असतो. अक्षय ऊर्जा श्रोतांमध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जल ऊर्जा, भरती, ओहोटी उर्जा, भूत तापीय ऊर्जा, बायोमेस ऊर्जा यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
अक्षय ऊर्जा की शेतीसाठी खूप फायदेशीर बाब आहे. शेती म्हटलं की शेतीला लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता भासतेच. शेतकरी हे पाणी विविध स्त्रोतांमधून शेतीपर्यंत पोहोचवत असतात; जसे नदी, तळे इ. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाणी नेण्यासाठी आपल्याला विजेची गरज लागते. यासाठी आपण विद्युत मंडळावर अवलंबून न राहता अक्षय ऊर्जेचा वापर केला पाहिजे.
सौरऊर्जा कॅप्चर करण्यासाठी सौर पॅनेलचा वापर केला जातो. सुविधा प्रभावीपणे आणि अडथळ्यांशिवाय कार्यान्वित करण्यासाठी अधिक परवडणारे आणि उच्च ऊर्जा स्त्रोत आवश्यक आहेत. हे ऊर्जा स्त्रोत सुरक्षित, जोखीम-मुक्त असणे आवश्यक आहे आणि हे ऊर्जास्त्रोत लोकांना किंवा पर्यावरणाला हानी पोहचवत नाहीत. अक्षय ऊर्जेचा वापर अमलात आणला पाहिजे.
सौरऊर्जा ही पर्यावरणासाठी चांगला पर्याय
१) सौरऊर्जा पृथ्वीच्या नैसर्गिक संसाधनांसह कार्य करते तर पारंपरिक वीज नैसर्गिक संसाधनांना हानी पोहोचवते. सौरऊर्जा जीवाश्म इंधनाच्या वापरावर अवलंबून नाही. हवा किंवा पाणी प्रदूषित करत नाही आणि ग्लोबल वॉर्मिंगमध्ये वाटा देत नाहीत.
२) सौर उपकरणे बसवण्यास कमी खर्च आहे. कोळसा व इतर इंधने नष्ट होऊ शकतात. परंतु सूर्यप्रकाश कधी नष्ट होऊ शकत नाही आणि त्यामुळेच सौर ऊर्जा अत्यंत विश्वासार्ह आहे. जीवाश्म इंधनाची किंमत हळूहळू गगनाला भिडत आहे परंतु सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी काही खर्च नाही.
पवनऊर्जा
अनेक नूतनीकरणक्षम ऊर्जा स्त्रोतांमध्ये पवनऊर्जा देखील फायदेशीर आहे. कारण विजेच्या ग्रीडशी कनेक्शन नसलेल्या ठिकाणी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. पृथ्वीवर वारा सर्वत्र उपलब्ध आहे. पवनऊर्जा दुर्गम भागात उत्कृष्ट आहे. वारा कधीही न संपणारा स्त्रोत आहे. पवनऊर्जा उत्कृष्ट स्वरूपात विजेमध्ये रूपांतर करत असते. तसेच पवनऊर्जा फार कमी जमीन व्यापते.
जल ऊर्जा
जलऊर्जा ही वीज निर्मितीच्या इतर प्रकारांप्रमाणे जलविद्युत वीज निर्मितीसाठी टर्बाइनचा वापर करते किंबहुना ब्लेड फिरवण्यासाठी किंवा वाहणाऱ्या पाण्याची ऊर्जा वापरत असते. फिरणारे ब्लेड जनरेटरवर फिरवतात जे स्पिनिंग टर्बाइनच्या यांत्रिक ऊर्जेला विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित करतात. कॅनडा हा जगातील तिसरा सर्वात मोठा जलविद्युत उत्पादक देश आहे.
प्रज्ञेश भगत
कृषी अभियांत्रिकी, कोल्हापूर.
हेही वाचा : समृद्ध आरोग्याची मिळेल शाश्वती; सेंद्रिय शेतीच्या फायद्याची बात न्यारी