Join us

मोबाईलवरून पैसे पाठविताना ट्रान्झेंक्शन फेल झाल्यामुळे अडकलेले पैसे आता लगेच मिळणार; आली ही नवीन सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 15:16 IST

यूपीआयने केलेला व्यवहार पूर्ण होण्यात अडचणी, ट्रान्झेंक्शन फेल होणे, इंटरनेटची समस्या यामुळे यापुढे ग्राहकांचे गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी आता अनेक दिवसांची वाट पाहावी लागणार नाही.

यूपीआयने केलेला व्यवहार पूर्ण होण्यात अडचणी, ट्रान्झेंक्शन फेल होणे, इंटरनेटची समस्या यामुळे यापुढे ग्राहकांचे गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी आता अनेक दिवसांची वाट पाहावी लागणार नाही.

हे पैसे परत मिळावे यासाठी 'ऑटोमेटेड चार्जबॅक' प्रणाली देशभर लागू करण्यात आली आहे. स्वयंचलित चार्जबॅक प्रक्रिया १५ फेब्रुवारी २०२५ पासून लागू झाल्याने युजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे.

फेल झालेल्या व्यवहारांमध्ये गेलेले किंवा अडकलेले पैसे लगेच परत मिळावे यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने चार्जबॅकची प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला.

युजर्सच्या तक्रारींची दखल घेत एनपीसीआयने या प्रणालीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. नवीन नियमांमुळे चार्जबॅक प्रक्रिया अधिक जलदगतीने होईल. युजर्सना अनावश्यक त्रास सहन करावा लागणार नाही.

पैसे कसे परत मिळणार?१) व्यवहार फेल होणे किंवा पैसे अडकल्यास आता युजरला अनेक दिवस थांबावे लागणार नाही. अशा स्थितीत आता पैसे परत मिळावे यासाठी पूर्वीसारखी बँकेकडे तक्रार करण्याची गरज नाही.२) तुमच्या बँकेकडून चार्जबॅकच्या विनंतीवर तत्काळ प्रक्रिया केली जाईल. ही प्रक्रिया आता स्वयंचलित करण्यात आली आहे.३) यामुळे रिफंडची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक वेगवान आणि पारदर्शक होईल. पैसे त्वरित तुमच्या खात्यात जमा होतील.

चार्जबॅक व रिफंडमध्ये फरक काय?चार्जबॅक आणि रिफंड या दोन्ही प्रक्रिया ग्राहकाकडून झालेल्या व्यवहाराचे पैसे परत मिळण्यासाठी केल्या जातात. परंतु दोन्हीमध्ये महत्त्वाचा फरक असतो.रिफंड : ग्राहकाला यासाठी सेवा देणाऱ्या एजन्सीकडे पैसे परत मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो.चार्जबॅक : यामध्ये संबंधित ग्राहकाला त्याच्या बँकेकडे अर्ज करून झालेल्या व्यवहाराची तपासणी आणि रकमेची परतफेड करण्याची विनंती करावी लागते.

तक्रार कोठे करावी?यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर तुम्हाला याची तक्रार नोंदवता येते. टोल फ्री क्रमांक १८००१२०१७४० वर कॉल करून या व्यवहाराची माहिती द्यावी.

चार्जबॅक का केला जातो?• कोणत्याही प्रकारचा व्यवहार कोणत्याही कारणामुळे अपूर्ण राहिला तर त्याचे पैसे ग्राहकांना परत दिले जातात. सामान्यपणे कोणतीही तांत्रिक अडचण येणे किंवा फसवणूक झाल्याच्या स्थितीत ग्राहकाला पैसे परत केले जातात. यालाच चार्जबॅक असे म्हणतात.• इंटरनेट समस्येत अडचणीमुळे व्यवहार पूर्ण न होणे, एकाच व्यवहाराचे वारंवार पैसे कट होणे किंवा फसवणुकीमुळे घेतलेले पैसे परत मिळवताना चार्जबॅक प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो.

अधिक वाचा: Farmer id : फार्मर आयडी नंबर मिळायला सुरवात; कसे चेक कराल तुमच्या आयडीचे स्टेटस? वाचा सविस्तर

टॅग्स :ऑनलाइनमोबाइलपैसाबँकइंटरनेट