Lokmat Agro >शेतशिवार > MNREGA Wages: 'रोहयो' मजुरांच्या कामाचे मिळेल दाम; रक्कम थेट होणार खात्यात जमा वाचा सविस्तर

MNREGA Wages: 'रोहयो' मजुरांच्या कामाचे मिळेल दाम; रक्कम थेट होणार खात्यात जमा वाचा सविस्तर

MNREGA Wages: 'Rohayo' laborers will get their wages; The amount will be directly deposited in their accounts. Read in detail | MNREGA Wages: 'रोहयो' मजुरांच्या कामाचे मिळेल दाम; रक्कम थेट होणार खात्यात जमा वाचा सविस्तर

MNREGA Wages: 'रोहयो' मजुरांच्या कामाचे मिळेल दाम; रक्कम थेट होणार खात्यात जमा वाचा सविस्तर

MNREGA Wages : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (MGNREGA) काम करणाऱ्या मजुरांना जानेवारीपासून थकीत मजुरीची (Wages) रक्कम आता थेट खात्यात जमा होणार आहे त्यामुळे आता रोहयो मजुरांच्या कामाचे मोल होणार आहे. (MNREGA Wages)

MNREGA Wages : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (MGNREGA) काम करणाऱ्या मजुरांना जानेवारीपासून थकीत मजुरीची (Wages) रक्कम आता थेट खात्यात जमा होणार आहे त्यामुळे आता रोहयो मजुरांच्या कामाचे मोल होणार आहे. (MNREGA Wages)

शेअर :

Join us
Join usNext

MNREGA Wages : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGA) राज्यातील ३४ जिल्ह्यांत ५१ लाख १३ हजार ४४८ मजुरांची गेल्या जानेवारीपासून थकीत मजुरीची रक्कम (Wages) देण्यासाठी निधी मंजूर देण्यात आली आहे. 

संबंधित मजुरांच्या खात्यात १ हजार २४० कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यापैकी १२१ कोटी रुपये वितरित करण्यात आले असून, थकीत मजुरीची रक्कम मजुरांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू करण्यात आल्याची माहिती नागपूर येथील रोहयो आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी शुक्रवारी दिली. (MNREGA Wages)

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायती आणि यंत्रणास्तरावर विविध कामे करण्यात येतात. रोहयो अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना केलेल्या कामाची मजुरी आठवडाभरात देणे आवश्यक आहे. (MGNREGA)

मजुरीची रक्कम मजुरांच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा केली जाते; परंतु रोहयोअंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील सर्व ३४ जिल्ह्यांत ५१ लाख १३ हजार ४४८ मजुरांना गेल्या जानेवारी ते २० एप्रिलपर्यतच्या कालावधीतील मजुरीची रक्कम मिळाली नाही. (MNREGA Wages)

केंद्र शासनाकडून १ हजार ३८८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यानंतर राज्यातील ५१ लाख १३ हजार ४४८ मजुरांची थकीत मजुरीची १ हजार २४० कोटी रुपयांची रक्कम मजुरांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. (MNREGA Wages)

मजुरीची रक्कम खात्यात

* रोहयोअंतर्गत राज्यातील ५१ लाख १३ हजार ४४८ मजुरांची थकीत मजुरीची १ हजार २४० कोटी रुपयांची रक्कम संबंधित मजुरांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

* २५ एप्रिलपर्यंत १२१ कोटी रुपयांची मजुरीची रक्कम मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आली.

* थकीत मजुरीची सर्व रक्कम मजुरांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया येत्या सात दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती नागपूर येथील रोहयो आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

हे ही वाचा सविस्तर : Chia Pik: जाणून घेऊयात चियाचे लागवड तंत्र आहे तरी काय?

Web Title: MNREGA Wages: 'Rohayo' laborers will get their wages; The amount will be directly deposited in their accounts. Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.