Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > पुण्यात १७ जानेवारीपासून मिलेट महोत्सव, अस्सल तृणधान्यांच्या नव्या उत्पादनांचा समावेश

पुण्यात १७ जानेवारीपासून मिलेट महोत्सव, अस्सल तृणधान्यांच्या नव्या उत्पादनांचा समावेश

Millet Mahotsav will be held in Pune from January 17, featuring authentic cereals | पुण्यात १७ जानेवारीपासून मिलेट महोत्सव, अस्सल तृणधान्यांच्या नव्या उत्पादनांचा समावेश

पुण्यात १७ जानेवारीपासून मिलेट महोत्सव, अस्सल तृणधान्यांच्या नव्या उत्पादनांचा समावेश

कुठे व कधीपर्यंत राहणार महोत्सव? काय कार्यक्रम असणार? जाणून घ्या...

कुठे व कधीपर्यंत राहणार महोत्सव? काय कार्यक्रम असणार? जाणून घ्या...

कृषी पणन मंडळाच्यावतीने आयोजित ‘मिलेट (पौष्टिक तृणधान्य) महोत्सव-२०२४’ चे उद्घाटन १७ जानेवारी रोजी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुणे येथे होणार आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट, पुणे येथे १७ ते २१ जानेवारी दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पनेअंतर्गत विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव आणि ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा यामागील उद्देश आहे.

अस्सल तृणधान्यांचा होणार समावेश

या महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागातून तृणधान्य उत्पादक, तृणधान्य प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्ट अप कंपन्या सहभागी होणार आहेत. या उत्पादकांना सुमारे ५० स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ग्राहकांना अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्रा ही तृणधान्ये व यापासून तयार करण्यात येणारा ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, रागीचा डोसा मिक्स आदी नाविण्यपूर्ण उत्पादने थेट उत्पादकांकडून प्रदर्शन तसेच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

मार्गदर्शनपर व्याख्याने

याबरोबरच महोत्सवात मिलेट उत्पादने, मूल्यवर्धीत प्रक्रिया उत्पादने, आरोग्यविषयक महत्त्व याविषयी नामांकित तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, खरेदीदार-विक्रेते संमेलन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. ग्राहकांनी मिलेट खरेदीसह विविध कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम आणि कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी केले.

Web Title: Millet Mahotsav will be held in Pune from January 17, featuring authentic cereals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.