lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > औषधी वनस्पती नवलकोल! आरोग्यास फायद्याची भाजी अनेकांना माहितीच नाही

औषधी वनस्पती नवलकोल! आरोग्यास फायद्याची भाजी अनेकांना माहितीच नाही

Medicinal Plants navalkol Many people are not aware health benefits vegetables | औषधी वनस्पती नवलकोल! आरोग्यास फायद्याची भाजी अनेकांना माहितीच नाही

औषधी वनस्पती नवलकोल! आरोग्यास फायद्याची भाजी अनेकांना माहितीच नाही

ही भाजी परदेशी असून तिचे उगमस्थान मूळचे युरोपातील आहे.

ही भाजी परदेशी असून तिचे उगमस्थान मूळचे युरोपातील आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सध्या देशात अनेक नागरिक परदेशी पालेभाज्या खातात. त्यापैकीच एक म्हणजे नवलकोल. नवलकोल ही कोबीवर्गीय भाजी अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही. पण ही भाजी परदेशी असून तिचे उगमस्थान मूळचे युरोपातील आहे. या भाजीचे आहारात आणि आरोग्यासाठी मोठे महत्त्व आहे. 

दरम्यान, नवलकोल ही पानकोबीसारखी दिसणारी भाजी असून ती कोबीच्या गड्डीसारखीच दिसते. या जातीच्या नवीन सुधारित वाणे विकसित करण्यात आले असून महाराष्ट्रात अनेक शेतकरी याची लागवड करतात पण ग्राहकांना या भाजीविषयी जास्त माहिती नसल्यामुळे ग्राहकांकडून खरेदी केली जात नाही. 

दरम्यान ही परदेशी भाजी असल्यामुळे ही भाजी कच्चे सुद्धा खाल्ली जाऊ शकते. भारतात बऱ्यापैकी भाज्या शिजवून किंवा तळून खाल्ल्या जातात, पण परदेशी भाज्या कच्च्या खाल्ल्यास फायद्याच्या ठरतात.

कुठे केली जाते लागवड?
थंड हवेच्या ठिकाणी हे पीक चांगले येत असल्यामुळे देशातील जम्मू काश्मीर, आसाम, दक्षिणेतील काही भागात या नवलकोलची लागवड केली जाते. तर महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि पंजाब या राज्यातसुद्धा या पिकाची लागवड केली जाते.

उपयोग
नवलकोल चा उपयोग फक्त सॅलड म्हणून आहारात केला जातो. त्याचबरोबर यापासून लोणचे सुद्धा बनवले जाते. हे लोणचे बरेच दिवस टिकते. 

आरोग्यातील महत्त्व
ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे अशा लोकांना नवलकोल हे उपयुक्त आहे. त्याचबरोबर अन्न पचनासाठी सुद्धा याचा चांगला फायदा होतो. ही भाजी पित्तशामक, पथ्यकर तसेच कॅन्सर रोगावर गुणकारी आहे. 

दरम्यान, हिवाळ्यात हे पीक चांगले येते जास्त माहिती नसल्यामुळे या पिकाची लागवड जास्त शेतकऱ्यांकडून केले जात नाहीत. 

Web Title: Medicinal Plants navalkol Many people are not aware health benefits vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.