lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > सेंद्रीय शेतीच्या कामासाठी यंदाच्या जैविक इंडिया ॲवार्डने महाराष्ट्राचा सन्मान

सेंद्रीय शेतीच्या कामासाठी यंदाच्या जैविक इंडिया ॲवार्डने महाराष्ट्राचा सन्मान

Maharashtra honored with this year's Jaivik India Award for its work in organic farming | सेंद्रीय शेतीच्या कामासाठी यंदाच्या जैविक इंडिया ॲवार्डने महाराष्ट्राचा सन्मान

सेंद्रीय शेतीच्या कामासाठी यंदाच्या जैविक इंडिया ॲवार्डने महाराष्ट्राचा सन्मान

सदर पुरस्कार कृषी विभागांतर्गत “डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन” या राज्य पुरस्कृत योजनेमध्ये सेंद्रिय शेती (organic farming) आणि कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सदर पुरस्कार कृषी विभागांतर्गत “डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन” या राज्य पुरस्कृत योजनेमध्ये सेंद्रिय शेती (organic farming) आणि कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागास राष्ट्रीय स्तरावरील व्दितीय क्रमांकाचा “जैविक इंडिया ॲवार्ड 2023” इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्ट, ग्रेटर नोएडा, नवी दिल्ली येथे दि. 7 सप्टेंबर, 2023 रोजी प्रदान करण्यात आला. कृषी विभागाच्या वतीने श्री. दशरथ तांभाळे, कृषी संचालक, आत्मा, पुणे यांनी पुरस्कार स्विकारला. सदर पुरस्कार कृषी विभागांतर्गत “डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन” या राज्य पुरस्कृत योजनेमध्ये सेंद्रिय शेती आणि कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.

इंटरनॅशनल कॉम्पीटन्स सेंटर फॉर ऑरगॅनिक ॲग्रीकल्चर (ICCOA), बेंगलुरु यांचेमार्फत सेंद्रिय शेती आणि कृषी व्यवसायाला चालना देण्यात येते. सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती आणि कृषी व्यवसायाला चालना देणाऱ्या विशेष कार्य करणाऱ्या शासकीय संस्था, अशासकीय संस्था, शेतकरी, समूह, कंपन्या यांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल राष्ट्रीय स्तरावरील “जैविक इंडिया ॲवार्ड” देण्यात येतो.

विदर्भातील आत्महत्याग्रस्त/नैराश्यग्रस्त अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा या 6 जिल्हयात वर्ष 2018-19 पासून डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत 9,268 शेतकऱ्यांचे 15,682 हे. क्षेत्र  सेंद्रिय प्रमाणिकरणाखाली आणण्यात आले आहे. योजनेअंतर्गत 20 हे. क्षेत्राचे 435 गट स्थापन करण्यात आले असून त्या गटांच्या 40 शेतकरी उत्पादक कंपन्या आणि त्यांचा महासंघ स्थापन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे एकूण रु. 2.82 कोटी भागभांडवल जमा झाले आहे. योजनेअंतर्गत 12 किरकोळ विक्री केंद्र, 17 समुह संकलन केंद्र, महासंघ ऑरगॅनिक मिशन (MOM) नावाचा ब्रँड तयार करण्यात आला असून सदर ब्रँडच्या नावाने सेंद्रिय शेतमालाची विक्री करण्यात येते.

दि. 27 जून रोजीच्या शासन निर्णयान्वये “डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन” कार्यक्षेत्र विस्तारून संपुर्ण राज्यासाठी लागू करण्यात आली असून योजनेचा कालावधी सन 2027-28 पर्यंत वाढविण्यात आला आहे. योजनेअंतर्गत तीन वर्षात राज्यात 13 लाख हे. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीखाली आणावयाचे आहे. समुह संकल्पनेद्वारे 18,820 उत्पादक गट व 1825 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे.

नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जैवनिविष्ठा संसाधन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीवरील संशोधन व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

नैसर्गिक व सेंद्रिय शेती योजनेचा लाभ घेण्यासाठी नजिकच्या तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हास्तरावर प्रकल्प संचालक, आत्मा यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. दशरथ तांभाळे, कृषी संचालक, आत्मा, पुणे यांनी केले आहे.

Web Title: Maharashtra honored with this year's Jaivik India Award for its work in organic farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.