महावितरणच्या २०२५-२६ ते २०२९-३० या पाच आर्थिक वर्षांच्या बहुवार्षिक वीजदर याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आपला आदेश आज प्रसिद्ध केला आहे.
महावितरणने पाच वर्षात वीजदर कपातीसाठी मांडलेला प्रस्ताव मान्य केला आहे. यामुळे घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक अशा सर्व प्रवर्गातील ग्राहकांसाठीचे वीजदर २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होणार आहेत.
कोणत्याही प्रवर्गात वीजदर वाढणार नाहीत असे महावितरणने स्पष्ट केले आहे. पुढील पाच वर्षे वीज स्वस्त होणार असून महिना शंभर युनिटपर्यंत वीज ग्राहकांसाठीचा सरासरी दर ७ रुपये ३१ पैशावरून कमी होऊन ७ रुपये १० पैसे होईल.
या ग्राहकांसाठीचा वीजदर पाच वर्षात २६ टक्के इतका कमी होणार आहे. शंभर ते तीनशे युनिट वापर असलेल्या ग्राहकांसाठीचा दर १३ रुपये १७ पैसे यावरून कमी होऊन १२ रुपये ९४ पैसे होईल.
उच्चदाब औद्योगिक ग्राहकांसाठीचा दर १० रुपये ७८ पैसे यावरून कमी होऊन १० रुपये ७१ पैसे इतका होईल असेही सांगितले.
| वीजवापर (युनिट) | २०२६ | २०२७ | २०२८ | २०२९ | २०३० |
|---|---|---|---|---|---|
| १-१०० | ७.३१ | ७.१० | ७.०० | ६.२० | ६.०० |
| १०१-३०० | १३.१७ | १२.९४ | १२.७९ | १२.६२ | १२.६२ |
| ३०१-५०० | १७.५६ | १७.३५ | १७.२७ | १६.३८ | १६.३५ |
| ५०० पेक्षा अधिक | १९.१५ | १९.१४ | १९.४० | १८.४७ | १८.४७ |
स्मार्ट मीटर ग्राहकांना मोठी सवलत
स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांना सकाळी ९ ते दुपारी ५ या कालावधीसाठीच्या वीजवापरासाठी प्रति युनिट ८० पैसे सवलत मिळत होती ती आता २०२६-२७ या आर्थिक वर्षात ८५ पैसे प्रति युनिट इतकी सवलत असेल.
वाहन चार्जिंग स्टेशनसाठी मोठा दिलासा
◼️ उच्चदाब व लघुदाब विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनसाठी २०२६-२७ या वर्षासाठी ९ रुपये ५० पैसे प्रति युनिट दर निश्चित केला आहे. हा दर २०२८-२९ पर्यंत स्थिर राहणार आहे.
◼️ त्यामुळे विद्युत वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळेल. हाऊसिंग सोसायट्या आपल्या आवारात विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी लघुदाब केंद्र सुरू करू शकतात.
अधिक वाचा: रॉकेल विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये केली दुप्पट वाढ; प्रति लिटर आता किती मिळणार कमिशन?
