New Soybean Variety : येत्या खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी एक मोठा पर्याय उपलब्ध होणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक संशोधन केंद्राने विकसित केलेले सोयाबीनचे नवीन वाण आता प्रसारणाच्या उंबरठ्यावर आहे. (New Soybean Variety)
‘अंबा’ आणि ‘सुवर्ण सोया’ या यशस्वी वाणांनंतर पीडीकेव्हीकडून येणारा हा नवा वाण विदर्भ-मराठवाड्यातील उत्पादकांच्या अपेक्षा वाढवणारा ठरणार आहे. (New Soybean Variety)
राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अमरावती येथील प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्राने सोयाबीनचे नवे, अत्याधुनिक आणि अधिक उत्पादनक्षम वाण विकसित केले आहे. हे वाण लवकरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार असून येत्या खरीप हंगामात त्याची पेरणी शक्य होणार आहे.
'पीडीकेव्ही'कडून नवीन सोयाबीन वाण
गेल्या ४–५ वर्षांत पीडीकेव्हीच्या संशोधन केंद्राने अनेक सुधारित वाण विकसित केले आहेत. यापैकी पीडीकेव्ही अंबा आणि सुवर्ण सोया या वाणांनी विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्रभर मोठी लोकप्रियता मिळवली आहे.
उत्पादन, तेल प्रमाण, आणि रोगप्रतिकारक क्षमता या तिन्ही बाबतीत ही वाण शेतकऱ्यांमध्ये विश्वासार्ह ठरली. आता या यशानंतर विद्यापीठाने नवीन सुधारित सोयाबीन वाण विकसित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
नवीन वाणाची वैशिष्ट्ये
* अधिक उत्पादनक्षम
* रोगप्रतिकारक क्षमता वाढवलेली
* खराब हवामानास तग धरणारे
* तेलाचे प्रमाण चांगले
* कमी कालावधीत येणारे
* विदर्भ–मराठवाड्याच्या हवामानात अधिक योग्य
सोयाबीन बियाण्याचे नवे वाण विकसित करण्यात आले असून लवकरच ते प्रसारित केले जाईल. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना उपयोगी होईल. - डॉ. एस. एस. माने, संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन
संशोधनाची सर्व अंतिम टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण झाली असून आता वाणाची अधिकृत घोषणा, नावकरण आणि वितरण सुरू होणार आहे.
शेतकऱ्यांना कसा फायदा होणार?
नव्या वाणामुळे उत्पादनात वाढ
रोगटपणा कमी
प्रतिकूल हवामानातही स्थिर उत्पादन
तेल उद्योगांसाठी अधिक दर्जेदार धान्य
विदर्भ–मराठवाड्यात नियमितपणे भेडसावणाऱ्या पावसातील खंड आणि उष्णतेस अधिक तग धरणारे
वाण कधी उपलब्ध होणार?
अधिकृत प्रसारण लवकरच
खरीप २०२६ पेरणीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता
बियाणे उत्पादनासाठी विद्यापीठ, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि प्रमाणित बीज उत्पादक यांच्याकडून तयारी सुरू
राज्यातील सोयाबीन क्षेत्रासाठी मोठी सकारात्मक बातमी
मागील काही वर्षांत रोग, पावसातील अस्थिरता, आणि उत्पादन घट यामुळे सोयाबीन पिकाला गंभीर फटका बसला होता. पीडीकेव्हीकडून नवीन वाण उपलब्ध होणे म्हणजे राज्यातील ४० लाख हेक्टर सोयाबीन क्षेत्राला नवीन उर्जा मिळणे आहे.
