Agriculture News : अलीकडे रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. काही निवडक शेतकरी जैविक खतांना प्राधान्य देत आहेत. मात्र या रासायनिक खतांचा कमीत कमी वापर आणि अधिक कार्यक्षमता वाढवता येते. जेणेकरून रासायनिक खतांचा अधिकचा वापर टाळला जाईल.
अशा करा उपाययोजना
- माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे.
- बीजप्रक्रियेसाठी जैविक खतांचा वापर करावा.
- पेरणी करताना बियाणे व खत एकाच बेळी दिल्यास खत मुळांजवळ पडते व कार्यक्षमता वाढते.
- सेंद्रिय खते, हिरवळीची खते व जैविक खते यांचा एकात्मिक वापर करावा.
- नत्रयुक्त खते (उदा, युरिया) एकाच बेळी न देता पिकांच्या वाढीच्या टप्प्यानुसार विभागून घ्यावीत. (पेरणी, फुटबे फुटणे, तुरा/फूल येणे)
- नॅनो युरिया व नॅनो डीएपीची फवारणी केल्यास खतांची बचत होते व कार्यक्षमता वाढते.
- नत्र खतासाठी जैविक (अॅझाटोवॅक्टर, रायझोबियम), सेंद्रिय (शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत) व हिरवळीची खते (ताग, धैचा) वापर वाढवावा.
- स्फुरद (फॉस्फरस) मुळाजवळ द्यावा, कारण त्याची जमिनीत हालचाल कमी असते.
- स्फुरद विरघळणाप्या जिवाणूंचा वापर करावा.
- ठिबक सिंचनाद्धारे विद्राव्य खते दिल्यास पाणी व खताची बचत होते.
- सूक्ष्म अन्नद्रव्ये शेणखतासोबत वापरावीत.
- खत दिल्यानंतर हलके पाणी द्यावे, जेणेकरून रासायनिक खतांचा पाण्याद्वारे निचरा होणार नाही.
- पिकांची फेरपालट करावी.
- कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव
