Collector Land : कलेक्टर लँड म्हणजे अशी जमीन जी शासनाने/कलेक्टरने काही अटींवर कुणाला दिलेली असते. ही जमीन सामान्यतः पुनर्वसन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दलित/वंचित, सैनिक, स्वातंत्र्यसैनिक अशा विशिष्ट लोकांना सवलतीच्या दराने किंवा मोफत दिलेली असते. या जमिनीविषयी अधिक माहिती घेऊयात....
या जमिनीवर Non-Transferable (न हस्तांतरणीय) अशा अटी असतात. म्हणजे ठराविक काळापर्यंत ती विकता येत नाही. कलेक्टर परवानगीशिवाय अशी जमीन विकणे-बांधकाम करणे बेकायदेशीर ठरते.
सातबारा उतारा तपासा : त्यात शासकीय अनुदानित जमीन किंवा Class II Land अशी नोंद असते. Class I Land म्हणजे सामान्य जमीन जी मुक्तपणे विकता येते, पण वर्ग 2 ही कलेक्टरच्या अटींसह असते. अटी तपासा जमिनीवर बिनअटी रूपांतरण झाले आहे का हे खात्री करा. अजूनही जिल्हाधिकारी परवानगी लागते का हे तलाठी, तहसीलदार कार्यालयांच्या नोंदीतून पाहता येईल.
जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्या - वर्ग 2 जमीन विकत घ्यायची असल्यास, विक्रेत्याने जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करून परवानगी घेतलेली असणे आवश्यक आहे. ही परवानगी दस्तऐवजात नमूद असावी.
फसवणूक टाळा - अनेकदा लोक Collector Land सामान्य जमिनीप्रमाणे विकतात पण नंतर व्यवहार रद्द ठरतो. अशा जमिनीवर बँक कर्जही मिळत नाही.
बदल नोंद तपासा - विक्रीनंतर खरी नोंद झाली आहे का ते पहा. जिल्हाधिकाऱ्याने दिलेली सवलत मोडली आहे का हे खात्री करा, कारण मोडल्यास जमीन सरकारकडे परत जाते.
Collector Land ची वैशिष्ट्ये
साधारणतः पुनर्वसन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, सैनिक/स्वातंत्र्यसैनिक, मागासवर्गीय यांना दिलेली असते. अनुदानित किंमत किंवा मोफत दिली जाते. जमिनीवर अटींची जमीन (Conditional land) अशी नोंद असते.
विकत घेताना घ्यावयाची खबरदारी
- विक्रीला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आहे का?
- सातबारा उतारा - वर्ग २ की वर्ग १ आहे ते बघा.
- फेरफार नोंद झाल्यावर जमिनीची नोंद व्यवस्थित बदलली आहे का?
- जमिनीवर कोणते कर्ज / बंधन नाही ना?
- अनुभवी वकीलकडून कागदपत्रे तपासून घ्या.
- जर बँक कर्ज देत नसेल तर समजा जमीन अजूनही वर्ग २ मध्ये आहे.
अधिक माहितीसाठी जवळच्या तलाठी कार्यालयात भेट द्या.
