Join us

नाशिक खादी आणि ग्रामोद्योगच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण, वाचा संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 4:01 PM

साबण बनविण्यापासून ते ब्युटी पार्लरपर्यंत, फळ प्रक्रियेपासून ते मसाल्यापर्यंत इत्यादि प्रशिक्षणे दिले जातात.

डॉ. बी आर आंबेडकर ग्रामीण प्रोद्योगिकी एव प्रबंधन संस्थान हे राष्ट्रीय स्तरावरील खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे प्रशिक्षण केंद्र आहे. ही संस्था नाशिकमध्ये स्थित असून या संस्थेद्वारे नियमित तसेच अप्लावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात. यासाठी अनेक विद्यार्थी सहभागी होत असून विद्यार्थ्यांना राहण्याची देखील व्यवस्था या संस्थेद्वारे करण्यात येते. हे प्रशिक्षण केंद्र नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावर त्र्यंबक विद्यामंदिर या ठिकाणी कार्यरत आहे. काही प्रशिक्षण कार्यक्रम हे कमी कालावधीचे तर काही अधिक कालावधीचे आहेत. यातील काही प्रशिक्षणास विद्यावेतन दिले जाते. 

नियमित प्रशिक्षण कार्यक्रमनियमित प्रशिक्षण कार्यक्रमात ग्रामीण तेल तंत्रज्ञ हा दोन महिने कालावधीचा प्रशिक्षण वर्ग आहे यासाठी विद्यार्थ्यांना तीन हजार रुपयांचे प्रति महिना विद्या वेतन दिलं जातं. दुसरा खादी कताई प्रशिक्षण कार्यक्रम हा एक महिन्याचा असून यात देखील विद्यार्थ्यांना तीन हजार रुपयांचा विद्यावेतन प्रति महिना दिले जाते.

तर नियमित प्रशिक्षण कार्यक्रमात काही प्रशिक्षण हे शुल्क आकारून देखील घेण्यात येत असतात. यात बेकरी कोर्स, टेलरिंग व फॅशन डिझाईन कोर्स, फॅशन टेक्नॉलॉजी कोर्स, कॉम्प्युटर बेसिस कोर्स, खादी कटाई व बुनाई कोर्स, ब्युटी पार्लर कोर्स असे कोर्सेस उपलब्ध आहेत. यात बेकरी कोर्सचा कालावधी एक महिना, टेलरिंग व फॅशन डिझायनिंग एक महिना, टेलरिंग व फॅशन टेक्नॉलॉजी दोन महिने, कॉम्प्युटर बेसिक कोर्स एक महिना, खादी कताई व बुनाई दोन महिने, ब्युटी पार्लर एक महिना अशा कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात.

अल्पावधी प्रशिक्षण कार्यक्रमयात ग्रामीण तेल तंत्रज्ञ प्रशिक्षण कालावधी दोन आठवडे, फायबर फॅन्सी आर्टिकल्स प्रशिक्षण कालावधी दोन आठवडे, मसाला बनवणे दोन आठवडे, आंघोळीचा, कपड्याचे साबण बनवणे आणि डिटर्जंट पावडर, फिनाईल, अगरबत्ती बनवणे प्रशिक्षण कालावधी दोन आठवडे, पेपर कन्वर्जन यात पेपर प्लेट, द्रोण, पत्रावळी बनवणे दोन आठवडे, फळे आणि भाजीपाला प्रक्रिया दोन आठवडे अशाप्रकारे प्रशिक्षण वर्ग राबविण्यात येतात.

यात सहभागी कोण होऊ शकतं?प्रशिक्षणार्थीला लिहिता वाचता येणे. आवश्यक प्रशिक्षणार्थीचे वय कमीत कमी 16 वर्ष असावे. प्रशिक्षणार्थीलाशी प्रशिक्षण काळात खादीचा पोशाखाचा वापर करावा लागेल.  प्रशिक्षणार्थीची स्वयंरोजगारातून उद्योग निर्मिती करण्यासाठीची इच्छा असावी. प्रशिक्षणार्थीचे शारीरिक स्वास्थ चांगले असावे.

प्रशिक्षणात नेमकं काय ?निवास व भोजनाची व्यवस्था शुल्क भरून करण्यात येईल. प्रशिक्षण वर्ग, नवीनतम यांत्रिक कार्यशाळा, ग्रंथालय, प्राथमिक वैद्यकीय सुविधा, खेळाची सुविधा इत्यादी सुविधा मिळणार आहेत. दरम्यान अधिक माहितीसाठी डॉ. बी आर आंबेडकर ग्रामीण प्रोद्योगिकी एव प्रबंधन संस्थान खादी आणि ग्रामोद्योग आयोग नाशिक यांच्याशी संपर्क साधावा. 

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

 

टॅग्स :नाशिकशेतीखादीशेतकरीविद्यार्थी