Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Tur Kharedi : तूर खरेदीचा वेग वाढणार का? दीड महिन्यात साडेतीन टक्केच खरेदी

Tur Kharedi : तूर खरेदीचा वेग वाढणार का? दीड महिन्यात साडेतीन टक्केच खरेदी

latest news Tur Kharedi: Will the pace of tur purchases increase? Only three and a half percent purchases in one and a half months | Tur Kharedi : तूर खरेदीचा वेग वाढणार का? दीड महिन्यात साडेतीन टक्केच खरेदी

Tur Kharedi : तूर खरेदीचा वेग वाढणार का? दीड महिन्यात साडेतीन टक्केच खरेदी

Tur Kharedi : राज्यात किमान आधारभूत किंमत (MSP) दराने तूर खरेदीचा वेग अत्यंत संथ असल्याचे चित्र समोर आले आहे. नाफेड आणि एनसीसीएफने १ फेब्रुवारीपासून खरेदी सुरू केली असली तरी दीड महिन्यात केवळ १२ हजार ४०४ टन म्हणजेच ३.६८ टक्के तूर खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी केली असतानाही खरेदीचा वेग मंदावल्याने उद्दिष्टपूर्ती होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Tur Kharedi)

Tur Kharedi : राज्यात किमान आधारभूत किंमत (MSP) दराने तूर खरेदीचा वेग अत्यंत संथ असल्याचे चित्र समोर आले आहे. नाफेड आणि एनसीसीएफने १ फेब्रुवारीपासून खरेदी सुरू केली असली तरी दीड महिन्यात केवळ १२ हजार ४०४ टन म्हणजेच ३.६८ टक्के तूर खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी केली असतानाही खरेदीचा वेग मंदावल्याने उद्दिष्टपूर्ती होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Tur Kharedi)

Tur Kharedi : राज्यात तूर खरेदीचा वेग अत्यंत संथ असल्याचे चित्र समोर आले आहे. केंद्र सरकारने सन २०२५-२६ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत (MSP) दराने ३.३७ लाख टन तूर खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले असले तरी नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या दोन संस्थांनी दीड महिन्यात केवळ ३.६८ टक्के म्हणजे १२,४०४.९८८६ टन तूर खरेदी केली आहे. (Tur Kharedi)

खरेदी आणि नोंदणी प्रक्रियेचा संथ वेग लक्षात घेता एमएसपी (MSP) खरेदीची उद्दिष्टपूर्ती होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.(Tur Kharedi)

नोंदणी व खरेदीला उशिराने सुरुवात

तूर खरेदीसाठी नाफेड व एनसीसीएफने २० जानेवारीपासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू केली, तर प्रत्यक्ष खरेदी १ फेब्रुवारीपासून सुरू झाली. 

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाजारात तुरीची आवक वाढू लागली होती. मात्र खरेदी प्रक्रियेला जवळपास महिनाभर उशीर झाल्याने अनेक शेतकऱ्यांना खुल्या बाजारावर अवलंबून राहावे लागले.

एमएसपी ८ हजार; बाजारभाव ७ ते ७.६ हजार

केंद्र सरकारने चालू हंगामासाठी तुरीचा एमएसपी ८,००० रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे. सध्या खुल्या बाजारात चांगल्या प्रतिच्या तुरीला ७,००० ते ७,६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. 

काही दिवसांपूर्वी तुरीचा दर ८ हजार रुपयांवर गेला होता. मात्र जानेवारीमध्ये भारतीय व्यापाऱ्यांनी म्यानमारमधील लेमन तुरीचे आयात करार केल्यानंतर फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून आयात तूर भारतात येऊ लागली आणि बाजारातील दरांवर दबाव निर्माण झाला.

दर कमी होऊ लागल्यानंतर शेतकऱ्यांनी एमएसपी खरेदी केंद्रांवर नोंदणी करण्यास प्राधान्य दिले. मात्र नोंदणी आणि खरेदीचा वेग संथ असल्याने अनेक शेतकरी प्रतीक्षेत आहेत.

राज्यात ९७९ खरेदी केंद्रांना मंजुरी

राज्यात तूर खरेदीसाठी नाफेडने ७६१ तर एनसीसीएफने २१८ अशा एकूण ९७९ खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. यापैकी ८८१ केंद्र सुरू करण्यात आली असून त्यात नाफेडची ६८६ आणि एनसीसीएफची १९५ केंद्रे आहेत.

९ मार्चपर्यंत राज्यभरातील ५३ हजार ५६५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी नाफेडकडे ४८ हजार ३७२ तर एनसीसीएफकडे ५ हजार १९३ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.

केवळ ७,२०२ शेतकऱ्यांकडून खरेदी

१ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत नाफेडने ५,९८१ शेतकऱ्यांकडून १०,८९४.४००७ टन तूर खरेदी केली, तर एनसीसीएफने १,२२१ शेतकऱ्यांकडून १,५१०.५८७९ टन तूर खरेदी केली आहे.

याप्रमाणे दोन्ही संस्थांनी मिळून ५३ हजार ५६५ नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी केवळ ७,२०२ शेतकऱ्यांकडून १२,४०४.९८८६ टन तूर खरेदी केली आहे.

उद्दिष्टपूर्तीचे आव्हान

सध्या सुरू असलेली तूर खरेदी १ मेपर्यंत चालणार आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी नाफेड आणि एनसीसीएफला उर्वरित ५३ दिवसांत ४६,३६३ शेतकऱ्यांकडून सुमारे ३,२४,५९५ टन तूर खरेदी करावी लागणार आहे.

मात्र, खरेदीचा सध्याचा संथ वेग, तांत्रिक अडचणी आणि प्रशासनिक प्रक्रियेतील विलंब लक्षात घेता निर्धारित उद्दिष्ट गाठणे कठीण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

शेतकरी प्रतीक्षेत

एमएसपी (MSP) दराने तूर विक्रीची अपेक्षा ठेवून अनेक शेतकरी खरेदी केंद्रांकडे नोंदणी करूनही प्रतीक्षेत आहेत. खरेदीचा वेग वाढवला नाही तर अनेकांना खुल्या बाजारात कमी दराने तूर विकण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : Tur, Chana Procurement : तूर-हरभरा खरेदी सुरू होणार कधी? शेतकऱ्यांचा सवाल

अधिक वाचा : Harbhara Bajarbhav : हरभऱ्याच्या आवकेत बदल; 'या' बाजारात दर झाले तेजीत वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur Kharedi: Will the pace of tur purchases increase? Only three and a half percent purchases in one and a half months