Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Tur Crop Management : बहरात असलेल्या तुरीवर पोखर अळीचा कहर; तातडीची उपाययोजना वाचा सविस्तर

Tur Crop Management : बहरात असलेल्या तुरीवर पोखर अळीचा कहर; तातडीची उपाययोजना वाचा सविस्तर

latest news Tur Crop Management: Bollworm wreaks havoc on blooming Tur; Read the urgent measures in detail | Tur Crop Management : बहरात असलेल्या तुरीवर पोखर अळीचा कहर; तातडीची उपाययोजना वाचा सविस्तर

Tur Crop Management : बहरात असलेल्या तुरीवर पोखर अळीचा कहर; तातडीची उपाययोजना वाचा सविस्तर

Tur Crop Management : खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसापाठोपाठ तुरीचीही मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. पीक बहरात असताना शेंगा पोखरणारी अळी अचानक शेतांवर तुटून पडल्याने तूर उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. फवारण्यांनंतरही अळीचा प्रादुर्भाव कमी न झाल्याने पिकाचे उत्पादन धोक्यात आले असून, कृषी विभागाकडून तातडीच्या उपाययोजना वाचा सविस्तर (Tur Crop Management)

Tur Crop Management : खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसापाठोपाठ तुरीचीही मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. पीक बहरात असताना शेंगा पोखरणारी अळी अचानक शेतांवर तुटून पडल्याने तूर उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. फवारण्यांनंतरही अळीचा प्रादुर्भाव कमी न झाल्याने पिकाचे उत्पादन धोक्यात आले असून, कृषी विभागाकडून तातडीच्या उपाययोजना वाचा सविस्तर (Tur Crop Management)

Tur Crop Management : खरीप हंगामात सोयाबीन, कापूस पाठोपाठ तुरीची मोठ्या प्रमाणात पेरणी झाल्यानंतर आता तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा (Pod Borer) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. (Tur Crop Management)  

तूर पिक फुलोरा व शेंगा धरु लागल्याच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर ही अळी धडकली असून हाताशी आलेले पीक धोक्यात आले आहे.(Tur Crop Management)  

या हंगामातील पेरणी स्थिती

नांदेड जिल्ह्यात या वर्षी खरीप हंगामात एकूण पेरणी  ७,५६,०५१ हेक्टर

सोयाबीन : ४,५५,६७१ हेक्टर

कापूस : १,९७,६४३ हेक्टर

तूर : ६०,९३० हेक्टर

ऑगस्ट–सप्टेंबरमधील अतिवृष्टी व पुढे झालेल्या पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले. त्यात तूर पीकही अनेक ठिकाणी कमकुवत झाले. 

आता शेवटच्या तसेच उत्पादनक्षम टप्प्यात पोखर अळीचा वाढता प्रादुर्भाव तुरीसाठी मोठे संकट बनला आहे.

तुरीवरील अळीचा उपद्रव वाढला कसा?

* तूर पिक सध्या फुलोरा–शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे

* या टप्प्यात पोखर अळी वेगाने वाढते

* अळी थेट शेंगांमध्ये भोक पाडते, दाणे खाते आणि शेंगा रिकाम्या होतात

* शेतकरी फवारणी करत असले तरीही अळीचा प्रादुर्भाव कमी होत नाही

शेतकऱ्यांची चिंता का वाढली?

* तूर जिल्ह्याचे महत्त्वाचे नगदी पीक

* शेंगा पोखरल्याने ३० ते ६० टक्के उत्पादन घटीची शक्यता

* बाजारात चांगला भाव असला तरी उत्पादन घटल्यास नुकसान वाढणार

* औषध फवारणीचा खर्च वाढून शेती आर्थिकदृष्ट्या अडचणीत

शेतकऱ्यांनी तुरीवर मोठे खर्च करून अतिशय अपेक्षेने पिक घेतले आहे. पण सध्या परिस्थिती बिकट असून तातडीच्या उपाययोजना नसल्यास मोठे नुकसान टळणे कठीण आहे.

तातडीच्या उपाययोजना 

फेरोमोन सापळे 

प्रतिहेक्टर ५ ते १० सापळे लावावेत

प्रौढ पतंग पकडले जातात आणि लोकसंख्या कमी होते

पक्षी थांबे

शेतात २०–२५ पक्षीथांबे/हेक्टर

पक्षी अंडी व लहान अळ्या खातात

अळ्या गोळा करून नष्ट करणे

सकाळी–सायंकाळी शेत पाहणी करून अळ्या वेचून नष्ट कराव्यात

जैविक कीटकनाशकांचा वापर

सुरुवातीच्या टप्प्यात एनपीव्ही (NPV)

बॅसिलस थुरिन्जियन्सिस (BT) आधारित औषधे

ट्रायकोग्रामा कार्डचा वापर

रासायनिक फवारणी (अतिशय आवश्यक असेल तेव्हा)

कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार,  शेतकऱ्यांनी सतत शेत पाहणी करावी तसेच आवश्यकतेनुसार फवारणी करावी. 

हे ही वाचा सविस्तर : Tur Crop Management : बदलत्या हवामानाचा तूर पिकावर परिणाम; तज्ज्ञांनी सांगितले 'हे' उपाय वाचा सविस्तर

Web Title : नांदेड जिले में अरहर की फसल पर फली छेदक का प्रकोप

Web Summary : नांदेड के किसान फली छेदक कीटों से जूझ रहे हैं, जिससे अरहर की फसल बर्बाद हो रही है। भारी बारिश से स्थिति और खराब हो गई। तत्काल कार्रवाई की जरूरत है।

Web Title : Pod Borer Infestation Threatens Pigeon Pea Crop in Nanded District

Web Summary : Nanded farmers face crisis as pod borers devastate pigeon pea crops. Heavy rains worsened the infestation. Integrated pest management is essential. Urgent action needed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.