Lokmat Agro >शेतशिवार > Telya Effect On Pomegranate : डाळिंब पिकावर संकट: तेल्या रोगाने बागा मेटाकुटीला; जाणून घ्या बचावाचे मार्ग

Telya Effect On Pomegranate : डाळिंब पिकावर संकट: तेल्या रोगाने बागा मेटाकुटीला; जाणून घ्या बचावाचे मार्ग

latest news Telya Effect On Pomegranate: Pomegranate crop in crisis: Telya disease has devastated the orchards; Know the ways to save it | Telya Effect On Pomegranate : डाळिंब पिकावर संकट: तेल्या रोगाने बागा मेटाकुटीला; जाणून घ्या बचावाचे मार्ग

Telya Effect On Pomegranate : डाळिंब पिकावर संकट: तेल्या रोगाने बागा मेटाकुटीला; जाणून घ्या बचावाचे मार्ग

Telya Effect On Pomegranate : डाळिंब बागायतदार आज हताश झाले आहेत. तीन-चार वर्षांच्या मेहनतीने उभ्या केलेल्या बागांना 'तेल्या' रोगाचा जबर फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी अनेक उपाय करूनही रोगावर नियंत्रण होत नसल्याने उत्पादन घटले, नुकसान वाढले आणि आता शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. (Telya Effect On Pomegranate)

Telya Effect On Pomegranate : डाळिंब बागायतदार आज हताश झाले आहेत. तीन-चार वर्षांच्या मेहनतीने उभ्या केलेल्या बागांना 'तेल्या' रोगाचा जबर फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी अनेक उपाय करूनही रोगावर नियंत्रण होत नसल्याने उत्पादन घटले, नुकसान वाढले आणि आता शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. (Telya Effect On Pomegranate)

शेअर :

Join us
Join usNext

Telya Effect On Pomegranate : डाळिंब बागायतदार आज हताश झाले आहेत. तीन-चार वर्षांच्या मेहनतीने उभ्या केलेल्या बागांना 'तेल्या' रोगाचा जबर फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी अनेक उपाय करूनही रोगावर नियंत्रण होत नसल्याने उत्पादन घटले आहे. (Telya Effect On Pomegranate)

धारूर तालुक्यातील डाळिंब बागायतदारांवर सध्या 'तेल्या' या महाभयंकर रोगाचे संकट कोसळले आहे. तीन-चार वर्षे मेहनतीने फुलवलेल्या डाळिंब बागा आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांनी विविध उपाय करून पाहिले तरी रोगावर नियंत्रण होत नसल्याने ते मेटाकुटीला आले आहेत.(Telya Effect On Pomegranate)

धारूर तालुक्यातील अरणवाडी, धुनकवड, आंबेवडगाव, चोरांबा, सोनीमोहा, जहांगीरमोहा, चोंडी आदी गावांतील डाळिंब उत्पादक शेतकरी प्रचंड नुकसान सहन करत आहेत. (Telya Effect On Pomegranate)

जवळपास २० हेक्टर क्षेत्र डाळिंबाखाली असून, आज या झाडांना पिवळसर तेलकट डागांनी झाकले आहे. हे डाग हळूहळू काळसर होत डाळिंब सुकते आणि झाडावरून गळून पडते.(Telya Effect On Pomegranate)

तेल्या रोगाचा प्रसार कसा झाला?

कृषी सहायक श्रीनिवास अंडिल यांच्या माहितीनुसार, तेल्या रोगाचा उगम कर्नाटकमध्ये झाला होता. तेथील शेतकऱ्यांनी बाधित झाडे उपटून नदीपात्रात फेकल्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहातून मराठवाड्यात पोचला आणि बीड जिल्ह्यासह धारूर तालुक्यात पसरला. हा रोग व्हायरसजन्य असून, त्यावर अद्याप कोणतेही निश्चित औषध उपलब्ध झालेले नाही.

विमा नाही, भाव कमी, उत्पादन घट

या रोगामुळे फळांचे उत्पादन घटले असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. डाळिंब पिकाला शासनाकडून रोग नियंत्रणासाठी कोणतेही विमा अनुदान दिले जात नाही. विमा योजना हवामान आधारित असल्यामुळे फक्त हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी परतावा मिळतो, असे विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले.

त्यातच बाजारात डाळिंबाला कमी दर मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी आता डाळिंबाऐवजी इतर फळपिकांकडे वळू पाहत आहेत. परंतु इतर पिकांनाही रोगराई आणि कमी भावाचा फटका बसत असल्याने शेतकरी अडचणीत आहेत.

उपाययोजना तरी काय?

कृषी विभागाकडून दिलेल्या मार्गदर्शनानुसार, सध्या तरी तेल्यावर एकमेव मार्ग म्हणजे झाडे आलटून-पालटून बुरशीनाशक आणि कीटकनाशक फवारण्या करून नियंत्रणात ठेवणे. या पद्धतीने काही प्रमाणात रोग आटोक्यात येतो.

शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, बाधित फळे झाडांवर ठेवू नयेत, वेळेवर छाटणी करावी आणि योग्य फवारणी करून झाडांचे संरक्षण करावे. कृषी विभागाकडून लवकरच मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

शासनाकडे मागणी

शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, डाळिंब पिकाला रोग नियंत्रणासाठी विशेष अनुदान योजना सुरू करावी, योग्य संशोधन करून तेल्यावर उपाय शोधावा आणि विमा योजनेत सुधारणा करून अशा रोगांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठीही संरक्षण द्यावे.

प्रतिबंधात्मक उपाय

रोगाची लागण झालेली फळं आणि फांद्या झाडावर ठेवू नका. ती वेगळी करून नष्ट करा.

बागेत हवा खेळती राहील, यासाठी योग्य छाटणी करा.

झाडांमधील अंतर योग्य ठेवा (गच्च लागवड टाळा), त्यामुळे बाग ओलसर राहत नाही.

सेंद्रिय उपाय

निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क यांची फवारणी केल्यास बागेत ओलसरपणा आणि बुरशीचा फैलाव कमी होतो.

ट्रायकोडर्मा किंवा इतर जैविक बुरशीनाशक मातीत मिसळा.

डाळिंब बागायतदार आज तेल्या रोगामुळे हवालदिल झाले आहेत. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरीत उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. दरम्यान कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळवून शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घेणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Bogus Pik Vima : बीड ते नांदेड… बोगस पीक विमा घोटाळ्याची व्याप्ती वाढली वाचा सविस्तर

Web Title: latest news Telya Effect On Pomegranate: Pomegranate crop in crisis: Telya disease has devastated the orchards; Know the ways to save it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.