Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Ragi Laddu : लहान मुलांसाठी सुपरफूड नाचणीचा पौष्टीक लाडू, अशी आहे सोपी रेसिपी, वाचा सविस्तर 

Ragi Laddu : लहान मुलांसाठी सुपरफूड नाचणीचा पौष्टीक लाडू, अशी आहे सोपी रेसिपी, वाचा सविस्तर 

latest news Superfood gram flour nutritious laddu for kids, this is the easy recipe, read in detail | Ragi Laddu : लहान मुलांसाठी सुपरफूड नाचणीचा पौष्टीक लाडू, अशी आहे सोपी रेसिपी, वाचा सविस्तर 

Ragi Laddu : लहान मुलांसाठी सुपरफूड नाचणीचा पौष्टीक लाडू, अशी आहे सोपी रेसिपी, वाचा सविस्तर 

Ragi Laddu Recipe : अशातच 'सुपरफूड' मानल्या जाणाऱ्या नाचणीचे लाडू हा एक उत्तम पर्याय आहे. 

Ragi Laddu Recipe : अशातच 'सुपरफूड' मानल्या जाणाऱ्या नाचणीचे लाडू हा एक उत्तम पर्याय आहे. 

Ragi Laddu Recipe :    वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि थंडावा राखण्यासाठी अनेक पेय व पदार्थांचे सेवन केले जाते, बाजारात अशा प्रकारचे पेय व पदार्थ सहज उपलब्ध होतात. अशातच 'सुपरफूड' मानल्या जाणाऱ्या नाचणीचे लाडू हा एक उत्तम पर्याय आहे. 

केवळ चविष्टच नव्हे, तर आरोग्याचा खजिना असलेले हे लाडू उन्हाळ्याच्या दिवसात शरीरासाठी अत्यंत लाभदायक ठरतात. नाचणीचे उत्पादन होत नसले तरी खाद्य भंडारमध्ये नाचणी उपलब्ध होते. त्यापासून केवळ पौष्टिक लाडूच नाही तर इतरही पदार्थ तयार करता येतात.

लाडूसाठी लागणारे साहित्य
मुख्य पीठ : दोन वाटी नाचणीचे पीठ, अर्धी वाटी
गव्हाचे पीठ. दीड वाटी गुळाची पावडर. १० काजू, १० बदाम, मगज बी, भोपळ्याची बी. साजूक तूप आणि सुगंधी वेलची पावडर

पदार्थ तयार करण्याची कृती

  • प्रथम एका कढईत साजूक तूप घेऊन नाचणी आणि गव्हाचे पीठ खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यावे. 
  • काजू आणि बदाम तुपात तळून त्याचे तुकडे पिठात मिसळावे.
  • या मिश्रणात गुळाची पावडर २ टाकून सर्व साहित्य एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे, जेणेकरून मिश्रण एकजीव होईल. 
  • शेवटी वेलची पावडर, मगज बी आणि भोपळ्याची बी आवडीनुसार घालून लाडू वळावेत.
  • लाडू तयार करण्यासाठी तुपाचा वापर केला जात असल्याने ते अधिकच पौष्टिक लागतात. मुलेसुद्धा चवीने खातात.

 

आरोग्यदायी फायदे

  • नाचणीची प्रकृती थंड असल्याने उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. 
  • कॅल्शिअमचा उत्तम स्रोत असल्याने मुलांच्या आणि वृद्धांच्या हाडांना मजबुती मिळते. 
  • गुळातील लोह आणि नाचणीतील पोषक घटकांमुळे अनिमियाचा त्रास दूर होतो.
  • रक्तवाढीसाठी फायदेशीर आहे. ड्रायफ्रूट्स आणि बियांच्या वापरामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

 

 

 पचनसंस्था सुधारते, वजन कमी करते, साखरेवर नियंत्रण ठेवते, 'ही' भाकर आहारात असायलाच हवी!

 

Web Title : रागी लड्डू: बच्चों के लिए पौष्टिक सुपरफूड, रेसिपी और फायदे

Web Summary : रागी लड्डू कैल्शियम और आयरन से भरपूर, एक स्वस्थ गर्मी का व्यंजन है। इस रेसिपी में रागी का आटा, गेहूं का आटा, गुड़, मेवे और घी का उपयोग होता है। यह रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाता है, वजन प्रबंधन में मदद करता है, और ऊर्जा प्रदान करता है। बच्चों और वयस्कों दोनों के लिए स्वादिष्ट और पौष्टिक विकल्प।

Web Title : Ragi Laddu: Nutritious Superfood Recipe for Kids, Benefits and Ingredients

Web Summary : Ragi laddu is a healthy summer treat, rich in calcium and iron. This recipe uses ragi flour, wheat flour, jaggery, nuts and ghee. It boosts immunity, helps in weight management, and provides energy. A delicious and nutritious option for kids and adults alike.