Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Sugarcane Workers : फडातच समुपदेशन; ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण वाचवण्याचा प्रयत्न

Sugarcane Workers : फडातच समुपदेशन; ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण वाचवण्याचा प्रयत्न

latest news Sugarcane Workers: Counseling in Fadat; Efforts to save the education of the children of sugarcane workers | Sugarcane Workers : फडातच समुपदेशन; ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण वाचवण्याचा प्रयत्न

Sugarcane Workers : फडातच समुपदेशन; ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण वाचवण्याचा प्रयत्न

Sugarcane Workers : ऊसतोडणीच्या हंगामात स्थलांतरित होणाऱ्या कामगारांमुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन परतूर तालुक्यात ऊसतोड कामगारांना मानसिक आधार देण्यासह शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारा उपक्रम राबविण्यात आला.(Sugarcane Workers)

Sugarcane Workers : ऊसतोडणीच्या हंगामात स्थलांतरित होणाऱ्या कामगारांमुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन परतूर तालुक्यात ऊसतोड कामगारांना मानसिक आधार देण्यासह शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारा उपक्रम राबविण्यात आला.(Sugarcane Workers)

Sugarcane Workers : हंगामी स्थलांतरामुळे कुटुंबापासून दूर राहून अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात मानसिक आधार आणि शिक्षणाचा प्रकाश पोहोचवण्यासाठी परतूर तालुक्यात एक अभिनव व दिलासा देणारा उपक्रम राबविण्यात येत आहे. (Sugarcane Workers)

मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने उसाच्या फडातच ऊसतोड कामगारांचे समूह समुपदेशन आयोजित करण्यात आले. या उपक्रमातून तब्बल १५१ ऊसतोड कामगारांच्या कौटुंबिक, मानसिक व सामाजिक समस्यांवर सखोल चर्चा करत त्यांना आरोग्य, पोषण आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.(Sugarcane Workers)

स्थलांतरामुळे शिक्षणात खंड

ऊसतोडणीच्या हंगामात हे कामगार आपल्या मूळ गावाहून दूर, राज्यातील विविध भागांमध्ये स्थलांतरित होतात. या काळात त्यांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहते आणि अनेक मुले शाळाबाह्य होण्याचा धोका निर्माण होतो. 

ही गंभीर बाब लक्षात घेऊन तज्ज्ञ समुपदेशकांनी थेट ऊसाच्या फडात जाऊन कामगारांशी संवाद साधला. कामाच्या व्यापामुळे निर्माण होणारा मानसिक ताण, कुटुंबापासून दूर राहण्याची वेदना, आर्थिक चणचण, व्यसनाधीनता तसेच मुलांच्या भविष्याविषयीची चिंता या विषयांवर कामगारांनी मनमोकळेपणाने आपली व्यथा मांडली.

शिक्षण, आरोग्य व व्यसनमुक्तीवर भर

समुपदेशनादरम्यान तज्ज्ञांनी संवादात्मक पद्धतीने कामगारांचे प्रश्न ऐकून घेतले. सकारात्मक विचारसरणी, तणाव व्यवस्थापन, कौटुंबिक संवादाचे महत्त्व, व्यसनमुक्तीचे फायदे यावर मार्गदर्शन करण्यात आले.

यासोबतच आरोग्याची काळजी कशी घ्यावी, पोषणयुक्त आहाराचे महत्त्व, तसेच स्थलांतराच्या काळातही मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी कोणते उपाय करता येतील, याबाबत मोलाचा सल्ला देण्यात आला.

कामगारांमध्ये वाढला आत्मविश्वास

या समूहचर्चेमुळे ऊसतोड कामगारांना एकमेकांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळाली. आपल्या समस्या एकट्याच नाहीत, ही भावना निर्माण झाल्याने अनेक कामगारांमधील भीती व नैराश्य दूर झाले.

या उपक्रमामुळे कामगारांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली असून, असे कार्यक्रम केवळ हंगामापुरते मर्यादित न ठेवता नियमितपणे राबविण्याची मागणीही करण्यात आली आहे.

उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शक अप्पासाहेब उगले, प्रकल्प संचालक भाऊसाहेब गुंजाळ, जिल्हा संपर्क अधिकारी व प्रकल्प व्यवस्थापक अश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वयक एकनाथ राऊत, राजेश वाघमारे, सुरेखा वाघमारे, दुर्गा नाडे, आकाश चौगुले, महादेव खरात, योगेश आढे यांनी परिश्रम घेतले.

सामाजिक परिवर्तनाकडे एक पाऊल

ऊसतोड कामगारांच्या जीवनातील मानसिक, सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांना थेट स्पर्श करणारा हा उपक्रम केवळ समुपदेशनापुरता मर्यादित न राहता शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा ठरत आहे.

अशा उपक्रमांमुळे ऊसतोड कामगारांचे आयुष्य अधिक सुरक्षित, सशक्त आणि आशादायी होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Sugarcane Workers : साखर शाळा नाहीतच; ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृहांचा आधार

Web Title : खेतों में परामर्श: गन्ना श्रमिकों के बच्चों की शिक्षा बचाने का प्रयास

Web Summary : मराठवाड़ा ग्रामीण विकास संस्थान गन्ना श्रमिकों के लिए खेतों में ही परामर्श प्रदान करता है, मौसमी प्रवासन से उत्पन्न पारिवारिक, मानसिक स्वास्थ्य और शैक्षिक चुनौतियों का समाधान करता है। इस पहल का उद्देश्य उनके कल्याण का समर्थन करना और बच्चों को स्कूल छोड़ने से रोकना है।

Web Title : Counseling in Fields: Saving Sugarcane Workers' Children's Education - An Effort

Web Summary : Marathwada Rural Development Institute provides on-site counseling for sugarcane workers, addressing family, mental health, and educational challenges arising from seasonal migration. The initiative aims to support their well-being and prevent children from dropping out of school.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.